Sayali Sanjeev: 'फक्त त्यामुळेच आमच्यात....' ऋतुराज सोबतच्या रिलेशनवर सायलीचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sayali Sanjeev

Sayali Sanjeev: 'फक्त त्यामुळेच आमच्यात....' ऋतुराज सोबतच्या रिलेशनवर सायलीचं मोठं विधान

Sayali Sanjeev Marathi Actress reaction indian cricketer Ruturaj Gaikwad : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव ही तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. सायलीचे इंस्टावरील फोटो पाहणे हे तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. गेल्या काही दिवसांपासून सायली आणि ऋतुराजबद्दल वेगवेगळ्या चर्चा व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर सायलीनं मोठं विधान केलं आहे.

भारतीय क्रिकेट संघातील महत्वाचा फलंदाज म्हणून ऋतुराज चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं सहा चेंडुमध्ये सात षटकार ठोकल्याचा पराक्रम करुन दाखवला होता. त्यावरुन नेटकऱ्यांनी सायलीला त्यावर प्रतिक्रियाही विचारली होती. आयपीएलच्या दरम्यान देखील या दोन्ही सेलिब्रेटींमधील गुलाबी चर्चेला चांगलेच उधाण आले होते. चाहत्यांना त्यांच्या फोटोवर कमेंट करणे आवडत असल्याचे दिसून आले होते. यासगळ्यावर आता सायलीनं स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

गोष्ट एका पैठणीची हा सायलीचा नवा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात चर्चाही आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. वेगवेगळ्या माध्यमातून ऋतुराज आणि सायली यांच्यातील नात्यावर बोललं जाऊ लागलं होतं. त्यावर आता सायलीनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. सायलीला त्याविषयी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तिनं दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेत आहे.

ऋतुराज आणि माझ्याविषयी जे काही बोललं जाऊ लागलं त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला असे मला सांगावे लागेल. त्यामुळे आमची मैत्रीही संपली. आम्ही आता मित्रासारखे बोलू शकत नाही. मला तर याविषयी काहीही माहिती नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे नाव त्याच्यासोबत कोण जोडत आहे हेही काही माहिती नव्हते. त्याच्या आणि माझ्या वयाबाबतही चर्चा होऊ लागली आहे. तो २५ वर्षांचा आहे. मी २९ वर्षांची आहे. माध्यमांच्या काही बातम्यांमुळे देखील त्यावर चर्चा सुरु झाली.

हेही वाचा: Malaika Arora: पन्नाशी गाठली पण तिचं सौंदर्य कमी होईना!

ऋतुराज हा चांगला खेळाडू आहे. आम्ही सुरुवातीला बोलायचोही. आपल्यात सगळ्या अफवा आहेत यावरही आमची चर्चा होत असे. जेव्हा खरे काही कळेल तेव्हा लोकं शांत बसतील असे आम्ही नेहमी बोलायचो. असेही सायलीनं यावेळी सांगितले.