2020 ची सर्वाधिक लोकप्रिय मालिका; 'स्कॅम 1922' आयएमडीचं रेटींग '9.5'

युगंधर ताजणे
Wednesday, 9 December 2020

या मालिकेला आयएमडीने 10 पैकी 9.5 रेटिंग दिले आहे. इतकी या मालिकेची लोकप्रियता आहे. सोनी लाईव्ह यांनी मालिकेची निर्मिती केली आहे.

मुंबई - चालू वर्षी सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून आयएमडीनं जे रेटिंग केलं आहे त्यात बहुचर्चित अशा स्कॅम 1992 मालिकेचे नाव पुढे आले आहे. आयएमडीबीच्या 10 सर्वोत्तम मालिकांमध्ये स्कॅमचा समावेश करण्यात आला आहे.

या मालिकेला आयएमडीने 10 पैकी 9.5 रेटिंग दिले आहे. इतकी या मालिकेची लोकप्रियता आहे. सोनी लाईव्ह यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. 250 वेबसीरीज पैकी सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून स्कॅम 1992 चे नाव घेतले गेले आहे. हर्षद मेहता यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. 1992 साली शेअर मार्केटमध्ये दलालीचे काम करणारा मेहता आणि त्यानं उभे केलेलं स्वताचे साम्राज्य याची कथा मालिकेत सांगण्यात आली आहे.

Scam 1992 review: A captivating cautionary tale | Entertainment News,The  Indian Express

सुरुवातीला या मालिकेवर टीका करण्यात आली होती. याचे कारण म्हणजे यात हर्षद मेहताचं करण्यात आलेलं चित्रिकरण. मात्र मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा राग निवाळल्याचे दिसून आले. मालिकेत हर्षद मेहता याची भूमिका प्रतिक गांधी याने केली आहे. आपल्या अति आत्मविश्वासाचा फटका, तसेच कमीतकमी वेळेत फार मोठे होण्याची झालेली घाई यामुळे सहन करावा लागणारा तोटा, पुढे त्याची आयुष्यभर मोजावी लागणारी किंमत हे सारे मालिकेत मांडण्यात आले आहे.

Panchayat (TV series) - Wikipedia

आयएमडीनं मालिकेतली वेगवेगळ्या बाबींचा विचार करुन त्याला 10 पैकी 9.5 गुण दिले आहे. आतापर्यत भारतात ज्या कुठल्या 250 मालिका प्रदर्शित झाल्या आहेत त्यापैकी स्कॅम 1992 ही सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेली मालिका आहे असे सांगण्य़ात येत आहे. यानंतर अॅमेझॉन प्राईंमवरील विनोदी मालिका पंचायत, स्पेशल ऑपरेशन, दहा भागातील संगीताची सफर घडविणारी बंदिश बँडिटसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय मिर्झापूर चा दुसरा सीझनला पाचवा क्रमांक मिळाला आहे.

Prime Video: Bandish Bandits - Season 1

याविषयी अधिक माहिती देताना आयएमडीचे सीईओ म्हणाले, य़ा वर्षी मोठ्या प्रमाणात वेबसीरीज प्रदर्शित झाल्या आहेत. कोरोनामुळे घरात राहाव्या लागलेल्या लोकांनी या काळात ब-याच वेबसीरीज पाहिल्या आहेत. 

Special Ops - Disney+ Hotstar

आशय, गुणवत्ता, नाविन्य, संशोधन, वेगळेपणा आणि मनोरंजन या गुणांना पात्र ठरलेल्या मालिकांची संख्या लक्षणीय म्हणावी लागेल. त्याला प्रेक्षकांचा पाठींबा मिळाला आहे. त्यांनी दिलेली पसंती सगळ्यात जास्त महत्वाची असल्याचे नीधम यांनी यावेळी सांगितले. 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scam 1992 leads IMDbs Top 10 Indian Web Series of 2020 list