रणबीर बनणार शाळकरी विद्यार्थी 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

रणबीर कपूरला बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते.

रणबीर कपूरला बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. अगदी "सावरियॉं'पासून "तमाशा'पर्यंत सर्व चित्रपटांतील त्याच्या सगळ्या भूमिका या आशिक, लव्हरबॉय, अशाच होत्या; पण आगामी "जग्गा जासूस'मध्ये तो प्रथमच शाळेत जाणाऱ्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

त्याचे पात्र वडिलांचा शोध घेत असल्याचे चित्रपटात दिसेल. माझी भूमिका चोख करण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे रणबीर म्हणाला. अनुराग बासू दिग्दर्शित "जग्गा जासूस' हा चित्रपट 14 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Schoolboy to become Ranbir

टॅग्स