कलाकारांची तगडी फौज 'धुरळा' उडवण्यासाठी सज्ज!

टीम ईसकाळ
Monday, 2 December 2019

मराठीतील तगडी स्टारकास्ट धुरळा चित्रपटात बघायला मिळेल. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. तसेच प्रत्येक भूमिकांचे स्वतंत्र पोस्टरही बघायला मिळत आहे.

'धुरळा'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पण धुरळा करेल हे टीझरवरून कळलं होतं. मराठीतील तगडी स्टारकास्ट या चित्रपटात बघायला मिळेल. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. तसेच प्रत्येक भूमिकांचे स्वतंत्र पोस्टरही बघायला मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

निवडणूकीची रणधुमाळी, प्रचाराची लगबग, राजकीय शत्रुत्व, महिलांचं राजकारणातलं अस्तित्व, विजयाचा गुलाल, राजकारणात डोकावू पाहणारी तरूणाई असे राजकारणाचे विविध रंग ट्रेलरमध्ये दिसले होते. अलका कुबल, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सुलेखा तळवळकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसतील. राजकीय भूमिकांमुळे प्रत्येकाच्या अभिनयाचा कस लागलाय.

हवा कुनाची रं? हवा फक्त आपलीच रं!; टीझरने उडवला 'धुरळा'

Image
अंकुश चौधरी

Image
अलका कुबल

Image
प्रसाद ओक

Image
सिद्धर्थ जाधव

Image
सई ताम्हणकर

Image
सोनाली कुलकर्णी

Image
अमेय वाघ

आधी #पुन्हानिवडणूक गाजली; आता 'धुरळा' उडणार!

झी स्टुडिओज, अनिश जोग, रणजित गुगळे यांची निर्मिती असलेला आणि समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित 'धुरळा' 3 जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित होईल. अनेक दिवसांनी मराठीत राजकाराणावर चित्रपट येत असल्याने तो कसा असेल, याकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही धुरळा उठत आहे. सत्तासंघर्ष सुरू आहे. अशातच राजकारणाची रणधुमाळी आणि #पुन्हानिवडणूक अशी पंचलाईन असलेल्या या चित्रपटात नक्की काय असेल हे बघण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second poster of Marathi movie Dhurala Launched