Rocky Aur Rani Ki Prem Kahani: जणू तो दुसरा सैफ अली खानच अवतरला,त्याला बघून...

इब्राहिमला बघताच चाहत्यांना लगेच तरूण सैफची आठवण होते.
Star KId Ibrahim Ali Khan seen on the sets of Rocky Aur Rani Ki Prem Kahani
Star KId Ibrahim Ali Khan seen on the sets of Rocky Aur Rani Ki Prem Kahaniesakal

सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम पडद्यावर येण्याआधीच बॉलीवुड फेम आहे असं म्हणायला हरकत नाही.(Ibrahim Ali Khan)तुम्हाला प्रश्न पडला असेल की पडद्यावर येण्याआधीच इब्राहिम चर्चेत का असतो ?तर त्याचं मोठं कारण इब्राहिमचं सैफ सारखं हूबेहूब दिसणं असू शकतं.इब्राहिमला बघताच चाहत्यांना लगेच तरूण सैफची आठवण होते.

इब्राहिमचे सोशल मीडिया अकाऊंट जरी खाजगी असले तरी त्याचे फोटोज सोशल मीडियावर भारी वायरल होताना दिसतात.(Karan Johar)सध्या इब्राहिम रणवीर सिंग आणि आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात करण जोहरला असिस्ट करत आहे.इब्राहिमचे सोशल मीडियावर बरेच फॅन पेज आहेत.(fan page)त्यातल्याच एका इन्स्टाच्या फॅन पेजला इब्राहिमचा हा सेटवरील न बघितलेला फोटो शेअर करण्यात आलाय.

या फोटोमधे इब्राहिमसमोर कॅमेरा ठेवलेला दिसतोय.तसेच तो रॉकी और रानी की प्रेम कहानीचा क्लॅपबोर्डही हातात धरताना दिसत आहे.(Camera)त्याच्या सेटवरील या लेटेस्ट फोटोने आणखी एकदा चाहत्यांना तरूण सैफची आठवण झाली आहे.(Alia Bhatt)इब्राहिमच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या लगेच प्रतिक्रिया देखिल उमटलेल्या दिसतात.एका नेटकऱ्याने तर 'सैफू सारखाच दिसतोय' तर दुसऱ्याने 'माशा अल्लाह !' अश्या प्रतिक्रिया फोटोला दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com