'उर्फीला मेट गालाची काय गरज ती तर रोजच...', तिचा नवा ड्रेस पाहून लोक झाले थक्क Urfi Javed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: 'उर्फीला मेट गालाची काय गरज ती तर रोजच...', तिचा नवा ड्रेस पाहून लोक झाले थक्क

उर्फी जावेदला नवीन ड्रेसमध्ये पाहून नेटिझन्स 'हिचा रोजच मेट गाला असतो' असं म्हणत आहेत. खरं तर, उर्फीने यावेळीही एक रिव्हीलिंग ड्रेस घातला होता, जो पाहून यूजर्स तिला खूप टोमणे मारत आहेत.

लोकप्रिय सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी आउटफिट्ससाठी ओळखली जाते, जी ती स्वतः डिझाइन करते आणि परिधान करते. ती 'बिग बॉस OTT' आणि 'MTV Splitsvilla' मध्ये दिसली आहे. पडद्यावर नसताना ती रोज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेते.

'बडे भैया की दुल्हनिया' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी उर्फी जावेद मंगळवारी मुंबईतील खार येथे दिसली. तिने हिरव्या रंगाचा कट-आउट बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला दिसत होता, ज्यामध्ये दोन्ही बाजुंना लेस बांधल्या होत्या. ती पापाराझींसाठी पोज देताना दिसली. तिच्या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने 'हिचा मेट गाला रोजच होतो' अशी कमेंट केली आहे. मेट गाला हा जगातील प्रसिद्ध फॅशन शोपैकी एक आहे. 1 मे रोजी न्यूयॉर्क शहरात झाला. आलिया भट्टपासून प्रियांका चोप्रापर्यंत यात सहभागी झाले होते.

आजकाल उर्फी मोठ्या फॅशन डिझायनर्ससोबत भरपूर फोटोशूट करत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि पोस्ट शेअर करत असते.

टॅग्स :actressEntertainment news