'3 इडियट्स'चा सिक्वेल लवकरच...- राजकुमार हिरानी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

आमीरही या तीन मित्रांची गोष्ट पुढे नेण्यासाठी '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये काम कारण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या सगळ्यांचे व्यस्त शेड्युल संपल्यावर नक्कीच आपल्याला '3 इडियट्स'चे चित्रिकरण सुरू झाल्याची गुडन्युज मिळेलच!

सध्या 'संजू'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ते '3 इडियट्स' चा सिक्वेल काढण्यास उत्सुक असल्याचे व त्यावर काम सूरू केले असल्याचे सांगितले. त्यामुळे '3 इडियट्स'चे चाहते ही बातमी ऐकून आनंदून गेले आहेत. माध्यमांशी नुकत्याच झालेल्या एका चर्चेत त्यांनी हा आश्चर्याचा धक्का दिला.

 rajkumar hirani

2009 मध्ये प्रदर्शित झालेला, आमीर खान, शर्मन जोशी, आर. माधवन व करिना कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या '3 इडियट्स'ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले. हा चित्रपट अशा प्रकारात गणला गेला जो कितीही वेळा बघितला तरी कंटाळा येणार नाही. शिक्षणावर भाष्य करणाऱ्या '3 इडियट्स'वर काही प्रमाणात टीकाही झाली होती. पण तरीही बॉक्स ऑफिसवर '3 इडियट्स'ने चांगलीच कमाई केली.  

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सांगितले की, '3 इडियट्सच्या सिक्वेलच्या कथेचे लिखाण मी सुरू केले आहे. हा सिक्वेल काढायचा हे नक्की आहे. या संदर्भातील दुसरे लेखक अभिजात जोशी व मी आम्ही दोघांनी यावर लिखाण चालू केले असून, ते अगदी पहिल्याच टप्प्यात आहे. या सिक्वेलसाठी मला योग्य वेळ द्यावा लागेल.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार '3 इडियट्स'च्या सिक्वेलचे काम हे 'संजू'नंतर सुरू होणाऱ्या 'मुन्नाभाई 3' चित्रपटानंतरच चालू होईल. 

आमीरही या तीन मित्रांची गोष्ट पुढे नेण्यासाठी '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये काम कारण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या सगळ्यांचे व्यस्त शेड्युल संपल्यावर नक्कीच आपल्याला '3 इडियट्स'चे चित्रिकरण सुरू झाल्याची गुडन्युज मिळेलच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sequel of 3 idiots is coming soon confirmed by rajkumar hirani