भारतीला 'दाढी-मिश्यां' वर कॉमेडी करणं पडलं महाग; शीख संघटना दाखल करणार FIR

भारतीनं आपल्या एका शो मध्ये दाढी-मिश्यांवर एक जोक मारला होता. आता अमृतसर येथील शीख संघटनेकडून तिच्या विरोधात जोरदार प्रदर्शन केलं जात आहे
SGPC Files Complaint Against Bharti Singh For Insensitive Remark Against Sikh Community
SGPC Files Complaint Against Bharti Singh For Insensitive Remark Against Sikh CommunityGoogle

भारती सिंगनं(Bharti Singh) विनोद केला आणि त्यावर कुणाला हसू नाही आलं तर नवलच म्हणावं लागेल. पण आता या कॉमेडी क्वीनला आपली ही हसवण्याची कला म्हणे भलतीच भारी पडलीय. दाढी-मिश्यांना घेऊन भारतीनं केलेल्या कमेंटचा तीव्र विरोध होताना दिसत आहे. भारतीनं आपल्या एका शो मध्ये दाढी-मिश्यांवर एक जोक मारला होता. ज्यावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे आणि या प्रकरणामुळे भारतीला ट्रोलही करण्यात आलं आहे. आता या प्रकरणात अमृतसर येथील शीख संघटनेकडून भारती सिंगच्या विरोधात जोरदार प्रदर्शन केलं जात आहे. हे प्रकरण तापतंय असं लक्षात आल्यानंतर भारतीनं शीख समुदायची माफी मागितली खरी पण तरिही भडका उडालेलाच आहे.

SGPC Files Complaint Against Bharti Singh For Insensitive Remark Against Sikh Community
प्रभासला चाहत्यानं लिहीलं 'Suicide Letter'; म्हणाला,'स्वतःला संपवीन जर...'

हाती लागलेल्या वृत्तानुसार,दाढी-मिशांवर भारती सिंगनं केलेल्या वक्तव्यावर एसजीपीसीनं तिच्या विरोधात FIR दाखल केली आहे. भारतीच्या दाढी-मिशांवरील वक्तव्यामुळे शीख संघटना तिच्यावर नाराज आहेत. मोहनी पार्कमध्ये भारती सिंगचं जुनं घर आहे. तिथे एसजीपीसीनं स्पष्ट जाहिर केलं आहे की ते भारती सिंग विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. एसजीपीसीच्या प्रवक्ताच्या म्हणण्यानुसार भारती सिंगच्या त्या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकं तिच्यावर खुपच रागावले आहेत. तिनं शीखांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आणि याच आरोपा अंतर्गत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली जाईल.

SGPC Files Complaint Against Bharti Singh For Insensitive Remark Against Sikh Community
लेकीला बॉलीवूड पदार्पणावर शाहरुखनं दिले खास सल्ले; काय म्हणाला किंग खान?

या प्रकरणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

भारतीच्या एका कॉमेडी शो मध्ये जास्मिन भसीन गेस्ट म्हणून आली होती. तिच्याशी मजेमजेत भारती बोलताना दिसत आहे की,''दाढी-मिशा का नकोत. दूध प्यायल्यानंतर दाढी तोंडात टाका म्हणजे शेवया खातोय असं वाटेल. माझ्या कितीतरी मैत्रिणी ज्यांची आता लग्न झाली आहेत त्या सगळ्याच दाढी-मिशांमधील उवा काढण्यात व्यस्त आहेत सध्या''. याच भारतीच्या बाष्कळ वक्तव्यानं सध्या वादाचं टोक गाठलं आहे.

SGPC Files Complaint Against Bharti Singh For Insensitive Remark Against Sikh Community
सुशांत सोबतची 'नाइट आऊट' अन् त्याचे सीक्रेट्स; कियारा अडवाणीचा मोठा खुलासा

भारती सिगंने या वादानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरन व्हिडीओ शेअर करीत माफी मागितली आहे. ती म्हणाली,''माझा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे आणि लोकं मला सारखं मेसेज करत विचारत आहेत की तू दाढी-ंमिश्यांची खिल्ली का उडवली आहेस. मी तो व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सारखा पहात आहे आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही देखील तो व्हिडीओ आवर्जुन पहा''.

भारती पुढे म्हणाली,''मी कोणत्याही विशिष्ट धर्माचा किंवा जातीचा उल्लेख करुन त्या विशिष्ट धर्माचे-जातीचे लोक दाढी-मिश्या ठेवतात आणि मग असे प्रॉब्लेम होतात असं म्हटलं नाही. पंजाबी लोकांसाठी मी नाही म्हटलं की ते दाढी ठेवतात. मी सहज बोलले होते. मी फक्त विनोद करत होती,माझ्या मेत्रिणीसोबत. दाढी-मिश्या तर आजकाल कुणीही ठेवतं. पण जर माझ्या बोलण्यानं कुणा विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून त्यांची माफी मागते. मी स्वतः एक पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरचा आहे. मी पंजाबचा सन्मान करते आणि मला अभिमान आहे की मी पंजाबी आहे''.

आपला माफी मागणारा व्हिडीओ पोस्ट करीत भारतीनं त्याला कॅप्शन दिलं आहे की,''मी कॉमेडी करते लोकांना हसवण्यासाठी,त्यामुळे कुणाला दुःख व्हावं असा माझा कधीच हेतू नसतो. जर माझ्या बोलण्यानं कुणी दुखावलं असेल तर त्यांनी मला बहिण समजून माफ करावं''. भारतीनं केलेली दाढी-मिश्यांवरची कॉमेडी तिच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. भारतीनं आपल्या वक्त्व्यावर माफी तर मागितली आहे पण तरी देखील हा वाद थांबण्याचं नाव घेत नसून तो वाढतच चालला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com