Rahul Dev: 'अमिताभ, शाहरुख, अक्षय 'बाहेरचे' तरी...'

यासगळ्यात अभिनेता राहुल देव त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूडमध्ये नेपोटिझम हा विषय नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो.
Rahul Dev
Rahul Devesakal

Bollywood News: बॉलीवूडचे सध्या बुरे दिन सुरु असल्याचे नेटकरी सांगतात. गेल्या काही दिवसांपासून बॉयकॉट असा ट्रेंड सुरु असल्यानं त्याचा मोठा परिणाम बॉलीवूडवर झाल्याचे दिसून आले आहे. आमिर खान, अक्षय कुमार यांना तर (bollywood Nepotism) मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं आहे. आमिरला तर कधीही वाटलं नव्हतं की, आपल्या लाल सिंग चढ्ढाला प्रेक्षक नाकारतील. अक्षयलाही त्याचा फटका बसला होता. त्याच्या रक्षाबंधनला बॉक्स ऑफिसवर अपयश आले. बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा संबंध नेटकऱ्यांनी या घटनेशी जोडला होता.

यासगळ्यात अभिनेता राहुल देव त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूडमध्ये नेपोटिझम हा विषय नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आता राहुलनं जे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बॉयकॉट आणि नेपोटिझमचा मुद्दा हा सातत्यानं समोर आला आहे. त्यामध्ये कपूर, खान, सेलिब्रेटी आणि त्यांचे बॉलीवूडवरील वर्चस्व याच्याविषयी अनेकदा नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली गेलीय. यासाऱ्या मुद्यांकडे राहुलनं लक्ष वेधले आहे. आणि अमिताभ, शाहरुख, अक्षय यांच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीमध्ये राहुलनं नेपोटिझमवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल म्हणतो शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार याशिवाय बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना हे तर बाहेरचे आहेत. असे असले तरी, त्यांना लोकांनी स्विकारले. त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे नेपोटिझम हे काही त्यांना लागू न होणारी गोष्ट आहे. त्यांनी त्यांची स्वताची वेगळी ओळख निर्माण केली. बाकीच्यांच्या मागे जसे गॉडफादर होते, तसे ते त्यांच्यामागे नव्हते. त्यामुळे त्यांना मोठ्या कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. असं राहुलनं म्हटलं आहे.

Rahul Dev
Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

राहुलनं त्या सेलिब्रेटींची तुलना बॉलीवूडमधील प्रसिद्ध फॅमिलींसोबत केली आहे. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. राहुलनं चित्रपट, वेबसीरिज यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे लोकप्रिय झालेल्या राहुलच्या घराणेशाहीच्या वक्तव्यावरुन आता वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी तुम्ही फिल्म फॅमिली असे म्हणता तेव्हा त्याला काही अभिनेते अपवाद आहेत. जे अपवाद आहेत त्यांची गोष्टच वेगळी आहे. असे राहुलने म्हटले आहे.

Rahul Dev
Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com