Shah Rukh Khan: अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख खान आणि गौरीने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan And Gauri Khan

Shah Rukh Khan: अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख खान आणि गौरीने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे सध्या तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. अलानाने गुरुवारी म्हणजेच १६ मार्च २०२३ रोजी तिचा परदेशी बॉयफ्रेंड इव्होर मॅक्रेसोबत लग्न केले. या लग्नाला इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती.

इंटरनेटवर लग्नानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि गौरी खान पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

अलाना पांडेच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अलानाची आई शाहरुख आणि गौरीला डान्ससाठी आमंत्रित करते. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि गौरी धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत.

यादरम्यान शाहरुख खानने काळ्या रंगाची कोट पँट घातली होती. तर गौरी हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत आहे. दोघेही डान्सचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अलीकडे, सुहाना खानने अलाना पांडेच्या संगीत सेरेमनीमध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम केलेली चांदीची सिक्वेन्स साडी परिधान केली होती. यासोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला होता.

या साडीसह, सुहानाने तिच्या लूकला मिनिमल अॅक्सेसरीज, मेकअप आणि फ्री हेअर डू सोबत पूर्ण केले होते. सुहाना खानने या साडीसोबत हाय हिल्स घातले होते. अलाना पांडेच्या संगीत सेरेमनीमध्ये सुहाना खानने परिधान केलेली सिक्वेन्स साडी तिची आई गौरी खानची होती.