
Shah Rukh Khan: ...म्हणून बदलली 'जवान'ची रिलीज डेट, शाहरुखने चाहत्यांच्या प्रश्नांना दिली मजेशीर उत्तरं
बी-टाऊनचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानला थिएटरमध्ये पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. 5 वर्षांनंतर शाहरुख 'पठाण' चित्रपटातून फिल्मी दुनियेत परतला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
आता चाहते शाहरुखच्या आणखी एका चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा चित्रपट आहे 'जवान'. 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
शाहरुख खान #ASKSRK सेशन दरम्यान ट्विटरवर त्याच्या चाहत्यांशी बोलतो आणि चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. 'जवान'ची रिलीज डेट बदलल्यानंतर शाहरुख खानने पुन्हा एकदा चाहत्यांसोबत #ASKSRK सेशन केलं.
'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे एक चाहता म्हणाला की, "सर बरं झालं जवान सप्टेंबर मध्ये केला, माझी परीक्षा १ जूनपासून सुरू होणार होती." यावर शाहरुखने प्रतिक्रिया दिली, "म्हणूनच पुढे ढकलली."
एका वापरकर्त्याने विचारले, "तुम्ही पोस्टरमध्ये का नाही?" यावर शाहरुख म्हणाला, “निर्मात्याने मला परवानगी दिली नाही. म्हटलं तुझं नाव पुरे. हाहा." एकाने विचारले, "मलाही यावेळी सीटबेल्ट लावण्याची गरज आहे का?" किंग खानने उत्तर दिले, "नाही , यावेळी फक्त हेल्मेट."
दक्षिण इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट आधी 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. काल शाहरुख खानने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना रिलीजची नवीन तारीख जाहीर केली होती.