
Shah Rukh Khan: म्हणुनच तो 'बादशाह' ! शाहरुखनं पुर्ण केली कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा...
गेल्या काही दिवसांपासून शाहरुखच्या एका फॅनची सोशल मिडियावर चर्चा रंगली होती. शाहरुख खानची एक फॅन जी गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे.60 वर्षीय शिवानी ही कर्करोगाची रुग्ण आहे. ती कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर आहे.
ती शाहरुखची खुप मोठी चाहती आहे. तिला मरण्यापुर्वी एकदा तरी शाहरुख खानला भेटायचं आहे अशी शेवटची इच्छा तिने सोशल मिडियाच्या माध्यमातुन व्यक्त केली होती. ज्याची सोशल मिडियावर खुप चर्चाही झाली.
तर बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला भेटण्याची कोलकाता येथील 60 वर्षीय कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा अखेर काल रात्री पूर्ण झाली. शाहरूखने तिला व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेळ काढला आणि तिच्याशी जवळपास 40 मिनिटे बोलला.
इतकच नाही तर मिडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात येत आहे की किंग खान शिवानीला आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.
शिवाणीने मुलीच्या लग्नाचे निमंत्रणही त्यांनी दिले होते. त्यावर शाहरुखने तिला आश्वासन दिले की तो तिला भेट देईल आणि कोलकाता येथे तिच्या घरी मासे देखील खाईल.
@SrkianFaizy9955 नावाच्या ट्विटर युजरने हे अपडेट शेअर केले आहे. निःसंशयपणे, आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि नम्र स्टार होता, आहे आणि राहील असंही त्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
किंग खान गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. टीव्हीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये एंट्री केली आणि काही वेळातच तो सुपरस्टार बनला. त्याचे चाहते हे भारतापलिकडे पसरले आहेत आणि शाहरुख खान हा त्याच्या चाहत्यांसाठी काहीही करु शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.