शाहरुख खान वरुण धवनला त्याच्या आगामी सिनेमात देणार संधी..

टीम ई सकाळ
बुधवार, 8 जुलै 2020

शाहरुख 'झिरो' या सिनेमानंतर दोन वर्ष पडद्यावर झळकलेला नाही त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तो वेगवेगळ्या स्क्रीप्ट वाचण्यावर भर देतोय. तो केवळ स्क्रीप्ट वाचन करत नाहीये तर त्याच्या प्रोडक्शन हाऊससाठी देखील सिनेमा सुचवण्याचं काम करतोय.

मुंबई- लॉकडाऊनमध्ये शाहरुख खान मिळालेल्या वेळेचा चांगला फायदा करुन घेतोय असंच दिसतंय. शाहरुख 'झिरो' या सिनेमानंतर दोन वर्ष पडद्यावर झळकलेला नाही त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तो वेगवेगळ्या स्क्रीप्ट वाचण्यावर भर देतोय. तो केवळ स्क्रीप्ट वाचन करत नाहीये तर त्याच्या प्रोडक्शन हाऊससाठी देखील सिनेमा सुचवण्याचं काम करतोय. शाहरुख खान त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या आगामी सिनेमात वरुण धवनला कास्ट करणार असल्याचं कळतंय.

हे ही वाचा: सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे करण जोहरच्या मुलांना येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या? रात्रंदिवस रडतोय करण..

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख त्याच्या प्रोडक्शन हाऊससाठी नवनवीन कथा वाचत आहे. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसचं संकट नष्ट होताच तो अनेक सिनेमांवर काम करण्याच्या तयारीत आहे. काही प्रोजेक्टसाठी तरुण अभिनेत्याची गरज आहे आणि म्हणूनंच शाहरुख त्याचा 'दिलवाले' सिनेमाचा सहकलाकार वरुण धवनला या सिनेमात मुख्य भूमिका देऊ शकतो अशी चर्चा आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, शाहरुखच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याने राजकुमार हिरानी यांच्यासोबत एक सिनेमा फायनल केला आहे. जो स्थलांतर या विषयावर आधारित असून एक सोशल कॉमेडी आहे. हे एक जागतिक संकट आहे ज्याला उत्तम सेन्स ऑफ ह्युमरने ट्रीट करणं गरजेचं आहे. ही कहाणी पंजाब आणि कनाडाभोवती फिरते.

Shah Rukh Khan to star next in a love story by Rajkumar Hirani?

या सिनेमातील शाहरुखच्या भूमिकेबाबत सांगायचं झालं तर शाहरुखचं पात्र असं आहे की जे नेहमी आनंदी असतं. तो दुस-यांना हसवतो पण स्वतः भावूक होतो. या भूमिकेसाठी शाहरुखने त्याचा लूकही बदलला आहे. शाहरुखने या पात्रासाठी केस वाढवायला सुरुवात केली आहे. 

याव्यतिरिक्त शाहरुख खान दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसून येईल. या सिनेमात तो एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचं शूट काही प्रमाणात बाकी आहे.   

shah rukh khan may cast varun dhawan in his next production film  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan may cast varun dhawan in his next production film