lockdown: शाहरुख खानने केली ट्रोलर्सची बोलती बंद, ही पहा मदतीची भलीमोठी यादी..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानवर सोशल मिडीयावरुन मदत न केल्याची टिका होत होती..मात्र आता शाहरुखने मोठ्या मनाने दिलेली ही मदत पाहून त्याला ट्रोल करण्या-यांची बोलती बंद होणार आहे..

मुंबई- कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी मदतीचा हात देत आहेत...यात अनेक दिग्गजांनी मदत केल्यानंतर बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानवर सोशल मिडीयावरुन मदत न केल्याची टिका होत होती..मात्र आता शाहरुखने मोठ्या मनाने दिलेली ही मदत पाहून त्याला ट्रोल करण्या-यांची बोलती बंद होणार आहे..शाहरुखने त्याच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट, रेड चिलीज विएफएक्स, आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्स आणि मीर फाऊंडेशन या कंपन्यांद्वारे मदत जाहीर केली आहे..

हे ही वाचा: लॉकडाऊनमध्ये मिळणार माधुरीकडून डान्स शिकण्याची संधी

शाहरुख खान कशा प्रकारे आणि कुठे मदत करणारे याचा संपूर्ण तपशील त्याने रेड चिलीज एंटरटेन्मेंटच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे..यावर दोन पानांचं एक स्टेटमेंट देखील त्याने जाहीर केलंय...या स्टेटमेंटमध्ये त्याने अनुक्रमे सगळ्या मदतींबाबत व्यवस्थित माहिती दिली आहे..या स्टेटमेंटनुसार किंग खानच्या कंपन्या सध्या मुंबई, दिल्ली आणि कोलकातामध्ये मदतीसाठी काम करतील..

शाहरुख खानने रेड चिलीज एंटरटेन्मेंटचं ट्वीट रिट्वीट करत लिहिलंय, 'हा जो काही काळ आहे, या काळात हे आवश्यक आहे की जे लोक तुमच्या आसपास तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, तुम्ही त्यांच्याशी जोडले गेले नाहीयेत, कदाचित त्यांचा तुमच्याशी काही संबंध नाहीये,तुमच्यासाठी अनोळखी आहेत, त्या सर्व लोकांना ते एकटे नाही आहेत याची जाणीव करुन दिली पाहिजे..चला आपण सगळे एकमेकांसाठी थोडं फार काहीतरी करुया..भारत आणि सगळे भारतीय एक कुटुंब आहे...' असं शाहरुखने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलंय..

शाहरुखने त्याच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे, रात्री नंतर नव्या दिवसाची सुरुवात होईल, दिवस नाही बदलणार फक्त तारीख बदलली जाईल..यासोबतंच शाहरुखने सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या कुटूंबासाठी प्रार्थना केली आणि इतरांनाही प्रार्थना करण्याचं आवाहन केलं..त्याच्या त्याच्या खास अंदाजात सोशल डिस्टन्सिंगसाठी आवाहन केलं..त्याने लिहिलंय, 'आणि कृपया करुन काही दिवसांसाठी शारिरिकदृष्ट्या थोडं लांब, आणखी लांब, जरा आणखी लांब...' असं म्हटलंय. 

किंग खान कशाप्रकारे करणार आहे मदत वाचा:
1. शाहरुख खान, गौरी खान, जुही चावला मेहता आणि जय मेहताच्या सह-मालकी असलेल्या आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सने पीएम केअर्स फंडला अघोषित रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे..

२. शाहरुख खान आणि गौरी खानच्यामालकीची रेड चिलीज एंटरटेन्मेंटने महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडासाठी योगदान देणार असल्याचं म्हटलं आहे..

३. मीर फाउंडेशन आणि कोलकाता नाईट रायडर्स मिळून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करेल आणि ५० हजार पर्सनल पोटेक्टिव इक्विपमेंट्स (PPE) देऊ करेल.

४. मीर फाऊंडेशन, एक साथ- द अर्थ फाऊंडेशनसोबत मिळून मुंबईमध्ये ५,५०० पेक्षा जास्त कुटुंबांना कमीत कमी एक महिन्याचं खाण्याचं सामान मोफत देईल. एका स्वयंपाक घराचीसुद्धा सोय केली गेली आहे जे दररोज २००० ताज्या जेवणाचे पॅकेट रोज घरी आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवले जातील.

Revealed: Reason Due to Which Gauri Khan Does Not Allow Shahrukh ...

५. मीर फाऊंडेशन, रोटी फाऊंडेशनसोबत मिळून कोरोना व्हायरसमुळे अडचणींना सामना करत असलेल्या निराधार आणि दिवसावर कमाई असलेल्या  मजुरांना जेवण देऊ करेल.हे ३ लाख खाण्याच्या पॅकेटची व्यवस्था करतील, ज्यातून १० हजार लोकांना दररोज जवळपास एक महिन्यांपर्यंतचं जेवण दिलं जाऊ शकेल..

६. वर्किंग पीपल चार्टरसोबत मिळून शाहरुखची मीर फाऊंडेशन दिल्लीमध्ये ओळख पटलेल्या २५०० दिवसावर कमाई असलेल्या मजुरांसाठी कमीत कमी एक महिन्यापर्यंत जीवनावश्यक गोष्टींचा आणि घरातील किराणाचा पुरवठा करेल.

७. मीर फाऊंडेशन उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये १०० पेक्षा जास्त ऍसिड अटॅकग्रस्तांना  मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एका महिन्याचं स्टायपेंड देईल..

या स्टेटमेंटमध्ये शाहरुख खानने म्हटलंय की,  ही एक सुरुवात आहे आणि कंपनीचे सर्व सदस्य यापुढेही अशा प्रकारचे काम करण्यास प्रयत्नशील राहतील..संपूर्ण भारतात जशा प्रकारची गरज असेल ती पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्यापरिने पूर्ण प्रयत्न करु.  

shah rukh khan pledge support to pm cares fund and cm relief fund and also extend contribution for food and grocery 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan pledge support to pm cares fund and cm relief fund and also extend contribution for food and grocery