करण जोहरच्या 'बर्थ डे' पार्टीतील फोटो Fake? चर्चेला उधाण

करण जोहरने नुकताच आपला ५० वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला. बॉलीवूडकर मोठ्या संख्येनं त्याच्या बर्थ डे पार्टीला उपस्थित राहिले होते.
Karan Johar
Karan JoharInstagram

करण जोहरने( Karan Johar) नुकताच आपला ५० वा वाढदिवस(50th Birthday) मोठ्या दणक्यात साजरा केला. बॉलीवूडसाठी ग्रॅंड पार्टी(Grand Patrty) करणनं दिली होती. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर(Social Media) अजुनही मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे लाईक्स मिळवताना दिसत आहेत.

Karan Johar
सैफच्या मुलाचा पहिला सिनेमा साऊथचा? करण जोहरनंच घेतलाय पुढाकार

या पार्टीमध्ये सलमान खान ते शाहरुख,आमिर,हृतिक रोशन,ऐश्वर्या राय,अभिषेक बच्चन,राणी मुखर्जी,करिना कपूर,सैफ अली खान पर्यंत सर्वचजण सामिल झाले होते. या पार्टीची जास्त चर्चा झाली ते एकाच ठिकाणी एक्स लव्हर्स एकमेकांच्या समोर आले तेव्हा. या पार्टीत तीन खान एकत्र आले त्याची चर्चा देखील अधिक रंगली. करण जोहरच्या या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाले आहेत.

Shah Rukh Khan, Salman Khan, Hrithik Roshan Photo From Karan Johar's B'day Bash is Fake
Shah Rukh Khan, Salman Khan, Hrithik Roshan Photo From Karan Johar's B'day Bash is FakeGoogle

सध्या पार्टीतला एका फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे,ज्या फोटोत शाहरुख,सलमान आणि हृतिक रोशन एकत्र पोझ देताना दिसत आहेत. पण हा फोटो Fake असल्याचं म्हटलं जात आहे. ही गोष्ट खरी आहे, की फोटो करण जोहरच्या पार्टीतीलच आहे. शाहरुख आणि सलमाननं एकत्र सेल्फि नक्कीच क्लिक केला होता पण त्यांच्यासोबत हृतिक रोशन मात्र नव्हता. त्यामुळेच हा फोटो फेक असल्याचं म्हटलं जात आहे.

जो फोटो प्रत्यक्षात क्लिक केला गेला होता,तो माधुरी दिक्षितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. कोणत्या तरी चाहत्यानं हा फोटो एडिट करीत माधुरी दिक्षितचे पती श्रीराम नेने यांच्या जागी हृतिक रोशनच्या फोटोला जोडलं. खऱ्या फोटोत शाहरुख खान, त्याची बायको गौरी खान आणि माधुरी दिक्षितचे पती श्रीराम नेने एकत्र दिसत आहेत. सोबत सलमान खान देखील आहे. या फोटोला चाहत्यांनी खूप लाईक्स मिळाले होते आणि प्रशंसा देखील केली होती.

सलमान,शाहरुख आणि माधुरीनं 'हम तुम्हारे है सनम' सिनेमात एकत्र काम केलं होतं. करण जोहरच्या पार्टीतील एक इनसाइड व्हिडीओ देखील चर्चेत आला. ज्यामध्ये शाहरुख खान डान्स फ्लोरवर एकदम स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,शाहरुख खानने करणच्या पार्टीत मागच्या दरवाजाना एन्ट्री घेतली होती. करण जोहरच्या पार्टीत गौरी खान,शाहरुख आणि त्यांचा मुलगा आर्यन खान एकत्र आले नव्हते,तर वेगवेगळ्या वेळी पोहोचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com