Pathaan: शाहरुख तो सीन करताना लाजला..! मला ५७ व्या वर्षी कपडे उतरवताना.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 shah rukh khan, pathaan

Pathaan: शाहरुख तो सीन करताना लाजला..! मला ५७ व्या वर्षी कपडे उतरवताना....

Shah Rukh Khan Pathaan News: शाहरुख खानचा पठाण अजूनही थिएटरमध्ये जोरात सुरु आहे. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाहरुख खानच्या पठाणने विक्रमी कमाई केली.

शाहरुख खानचा पठाण लवकरच १००० कोटी क्लबमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. पठाणमध्ये शाहरुख खानच्या अभिनयाच कौतुक झालं. पण जास्त चर्चा झाली शाहरुख खानच्या लुक्सची आणि त्याच्या बॉडीची.. \

(shah rukh khan says making him shirtless in pathaan)

वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुख खानच्या पिळदार शरीरयष्टीची खुप हवा झाली. शाहरुख मात्र पठाण साठी बॉडी दाखवताना काहीसा नाराज होता. त्याला लाज वाटत होती. एका मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला. पठाण मध्ये 'झूमे जो पठान' या गाण्यात शाहरुखला शर्टलेस दाखवण्यात आलं आहे. या गाण्यात शाहरुखचे एट पॅक अॅब्स स्पष्ट दिसत आहेत.

याविषयी बोलताना शाहरुख खान म्हणाला की, जेव्हा तो दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि कोरिओग्राफर बॉस्को मार्टिससोबत हे गाणे करत होता तेव्हा त्याला शर्टलेस बनवण्याचे षडयंत्र रचले गेले. शाहरुखचा शर्ट काढण्याचा कोणताही हेतू नव्हता, पण तसे करण्यास त्याला सांगितले गेले

शाहरुख खान पुढे म्हणाला की, "दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शकाने आधीच ठरवले होते की शाहरुख त्याच्या शर्टचे बटण हळू हळू काढून नंतर शाहरुखला शर्टलेस करायचं. शाहरुखने यापूर्वी कधीही त्याच्या abs सह सिग्नेचर स्टेप केली नव्हती.

त्यामुळे पठाण साठी abs दाखवणं त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्याला प्रचंड लाज वाटत होती. त्याने शूट करण्यासाठी अनेक टेक घेतले. पण आता शाहरुख खान आनंदी आहे.

शाहरुखची मुलं मात्र त्याची बॉडी पाहून खूप खुश झाले आहेत. जेव्हा त्याची मुलं शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहतात तेव्हा ते 'कूल बॉडी पप्पा' असं म्हणतात.

शाहरुख खान या गोष्टीचा आनंद तर आहेच, पण तो घाबरलाही आहे, कारण त्याला माहित नाही की तो पुढच्या सिनेमात पुन्हा हे करू शकेल की नाही?.

शाहरुख खानचा पठाण सिनेमा २५ जानेवारीला रिलीज झाला. सिनेमात शाहरुख सोबतच जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, डिंपल कपाडिया यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत

टॅग्स :Shah Rukh Khan