Pathaan on OTT: आता घरबसल्या पहा शाहरुखचा पठाण.. कधी,कुठे जाणून घ्या एका क्लीकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepika padukon, shah rukh khan, pathaan, pathaan on OTT, amazon prime

Pathaan on OTT: आता घरबसल्या पहा शाहरुखचा पठाण.. कधी,कुठे जाणून घ्या एका क्लीकवर

Pathaan on OTT Release Date News: शाहरुखच्या पठाणने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेला पठाण तुफान गाजला. पठाण मुळे बॉलिवूडला आलेली मरगळ पुसून टाकली.

शाहरुखच्या पठाणने बक्कळ कमाई केली. पठाण बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलाच पण हाच पठाण OTT वर रिलीज कधी होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. जाणून घ्या..

(Shah Rukh Khan Starrer ‘Pathaan’s Extended Version To Be Released On OTT Platform ‘Amazon Prime Video’)

पठाण OTT वर कधी? कुठे? केव्हा?

पठाण आता OTT वर रिलीज जाणार आहे. पठाण आता अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. पठाणची OTT रिलीजची तारीख सुद्धा निश्चित झालीय.

शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'पठान'ची विस्तारित आवृत्ती म्हणजेच Extended Version 22 मार्च 2023 ला OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओ वर रिलीज होणार आहे.. त्यामुळे पठाण घरबसल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे.

जे कोणी करू शकले नाही, ते बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने करून दाखवले. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने इतिहास रचला आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार केला.

रिलीजच्या पहिल्या टप्प्यात जगभरात 1000 कोटींची कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 516.92 कोटींवर गेले आहे. पठाणचा डंका देश-विदेशात वाजत आहे.

पठाण हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पठाणकडून त्याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

या चित्रपटात शाहरुख खानशिवाय जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, आशुतोष राणा आणि डिंपल कंपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता पठाण OTT वर रिलीज होत असल्याने पठाणची क्रेझ आणखी वाढणार आहे