'तू किंग खान आमच्यामुळे, एवढी गुर्मी बरी नव्हे!' शाहरुखवर नेटकरी का भडकले? | Shah Rukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : 'तू किंग खान आमच्यामुळे, एवढी गुर्मी बरी नव्हे!' शाहरुखवर नेटकरी का भडकले?

Shah Rukh Khan Viral Video Misbehaved mumbai airport : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. जोपर्यत पठाण बॉक्स ऑफिसवर सुरु होता तोपर्यतच किंग खाननं चांगुलपणाचा आव आणला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारण्यास सुरुवात केली आहे. त्याचे कारण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ खूप काही सांगून जाणारा आहे.

किंग खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. केवळ भारतातच नाहीतर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये त्याचे चाहते आहेत. त्यामुळे किंग खानसोबत एक सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची ओसंडून वाहणारी गर्दी अनेकांना माहिती आहे. त्यावेळी होणारा गदारोळही कित्येकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशातच विमानतळावर शाहरुखच्या चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला होता.

तो सेल्फी घेत असतानाच शाहरुखनं त्याच्यासोबत जे काही केले त्यामुळे किंग खानवर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे. त्याला खडेबोल सुनावले आहे. शाहरुख आज तू किंग खान आमच्यामुळे आहेस तेव्हा जास्त रुबाब करु नकोस. चाहत्यांसोबत कसे वागायचे हे तुला कळत नाही का, एवढा तुला कसला राग आला असे प्रश्न चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी शाहरुखला विचारले आहेत. त्याचे झाले असे की, शाहरुख विमानतळावर स्पॉट झाला होता.

शाहरुख विमानतळावर फोटोग्राफर्सला दिसला आणि त्यांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी असंख्य चाहते देखील तिथे होती. त्यांना देखील शाहरुखसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यापैकी एकानं शाहरुखबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. शाहरुखला मात्र ते काही आवडले नाही. त्यानं त्या चाहत्याचा हात झटकून टाकला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांना शाहरुखचे ते वागणे खटकले आहे, शाहरुख तुझे चाहत्यांसोबतचे वागणे चुकीचे होते. अनेकांनी आता त्याचा पठाण हिट झाला आहे. त्यामुळे त्याला खूप गर्व झाला आहे. हे दिसून येते आहे. शाहरुख तू चुकला आहेस. अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.