
Shah Rukh Khan: शाहरुख खान गौरीबद्दल होता पझेसिव्ह... तिला असे कपडे घालण्याची नव्हती परवानगी
शाहरुख खानचे त्याची पत्नी गौरीवर खूप प्रेम आहे आणि याचा उल्लेख त्याने अनेकदा केला आहे. गौरी आणि शाहरुखची लव्हस्टोरीही कोणापासून लपलेली नाही. गौरीशी लग्न करण्यासाठी शाहरुखने खूप कष्ट केले होते.
लग्नानंतर दोघेही एकमेकांची सपोर्ट सिस्टीम बनले आणि आजपर्यंत एकमेकांना सपोर्ट करत आहेत. मात्र, शाहरुखबद्दल बोलताना गौरीने सांगितले की, तो स्वभावाने खूप पझेसिव्ह आहे. शाहरुखमध्ये पझेसिव्हनेस इतका होता की तो कपड्यांवरही बंधने घालत असे.
याचा खुलासा खुद्द गौरीने 1997 मध्ये सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये केला होता. शाहरुखच्या पझेसिव्ह स्वभावाबद्दल बोलताना गौरी म्हणाली होती, "शाहरुख सुरुवातीला माझ्याबद्दल इतका पझेसिव्ह होता.
शाहरुखने मला पांढरा टॉप घालण्यासही नकार दिला होता, कारण तो टॉप खूप ट्रांसपरंट असतो". यासोबतच गौरीने असेही सांगितले होते की, शाहरुखला गुडघ्याच्या वर ड्रेस घातलेला आवडत नसे. शाहरुखही गौरीच्या या खुलाशाला सहमती देताना दिसला.
गौरीबद्दलच्या त्याच्या पझेसिव्ह स्वभावाबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, "मी गौरीबद्दल खूप पझेसिव्ह होतो. जेव्हा ती कोणाशी पण बोलायची तेव्हा मला खूप हेवा वाटायचा. मात्र, स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराप्रती ही भावना नक्कीच असते".
या कृत्यांमुळे गौरीने शाहरुखसोबतचे संबंध तोडल्याचे सांगितले जाते, त्यानंतर शाहरुख तिचे मन वळवण्यासाठी तिच्या मागे मुंबईला गेला. मात्र, नंतर गौरीने खूप विनवणी केल्यानंतर होकार दिला.