Happy Birthday Shah Rukh : शाहरुख जेव्हा दूरदर्शनवर झळकायचा...

Shah Rukh khan was used to anchoring on Doordarshan
Shah Rukh khan was used to anchoring on Doordarshan

मुंबई : किंग खान शाहरूखचा आज 54वा वाढदिवस! त्याच्या स्ट्रगलबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.  'झिरो' चित्रपटानंतर शाहरुख फार कुठे दिसला नाही. सध्या तो सोशल मीडियावरही अॅक्टीव दिसत नाही. बॉलिवू़डचा किंग खान अर्थात शाहरुख आज सुपरस्टार असला तरी त्याने केलेलं स्ट्रगल सर्वांना माहितच आहे. करिअरच्या सुरवातीच्या काळात शाहरुखने अनेक कार्यक्रमातून काम केले. मध्ये किंगखानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला होता. जाणून घ्या काय आहे कारण!

शाहरुख सुरवातीच्या काळात म्हणजेच 90 च्या दशकात दूरदर्शन वाहिनीसाठी सूत्रसंचालनाचं काम करत असे. त्यावेळेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दूरदर्शनवरील एक गाण्याच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. न्यू ईयरच्या सायंकाळच्या कार्यक्रमाचं होस्टींग शाहरुख एका महिला सूत्रसंचालिकेसोबत करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये शाहरुख बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना आमंत्रित करतो. चाहत्यांनी या व्डिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत तो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ShahrukhKhan as a tv anchor for a singing programme of #Doordarshan. #srk #shahrukh

A post shared by Bollywoodirect (@bollywoodirect) on

शाहरुखने 1992 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'दिवाना' चित्रपटासह त्याने बॉ़लिवूडमध्ये पाऊल टाकलं आणि त्यानंतर एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले. वेगळ्या अभिनय शैलीसह शाहरुखने चाहत्यांच्या मनात घर केले. 'राजू बन गया जेंटलमन', 'किंग अंकल', 'बाजीगर' आणि 'डर' असे काही जबरदस्त सिनेमे त्याने केले. त्यानंतर 'माय नेम इज खान', 'चक दे इंडिया', 'कुछ कुछ होता है', 'देवदास', 'कल हो ना हो', 'वीर झारा' हे शाहरुखने केलेले चित्रपट आजही चाहत्यांच्या मनावर कायम आहेत. 'डिअर जिंदगी'मध्ये तो आलिया भटसोबत दिसला. आपल्याहून निम्या वयाच्या अभिनेत्रीसह काम करुनही त्याने 'डॉक्टर जहांगिर खान' या भूमिकेला पूर्ण न्य़ाय दिला. प्रेक्षकांनी त्याने साकारलेल्या अनोख्या भूमिकेला भरपूर पसंती दिली.

शाहरुखचा वाढदिवस सुरु झाल्याक्षणीच या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी थेट त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने मोठ्या हक्काने धाव घेतली. बिहार, दिल्ली आणि इतरही बऱ्याच ठिकाणहून हे चाहते नित्यक्रमाने शाहरुख दीर्घायुषी होवो... ही 'मन्नत' करताना दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com