किंग खानच्या दीर्घायुष्यासाठी चाहत्यांची 'मन्नत'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

दोन नोव्हेंबर हा दिवस बाॅलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एकदम स्पेशल असतो, कारण या दिवशी किंग खानचा वाढदिवस असतो.

मुंबई : दोन नोव्हेंबर हा दिवस बाॅलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एकदम स्पेशल असतो, कारण या दिवशी किंग खानचा वाढदिवस असतो. या दिवशी त्याचे चाहते त्याच्या मुंबईतील 'मन्नत' या निवासस्थानाबाहेर गर्दी करून त्याला शुभेच्छा देतात. आज देखील त्याच्या चाहत्यांनी नेहमीसारखीच गर्दी करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हा त्याचा ५४वा वाढदिवस आहे. 

शाहरुखचा वाढदिवस सुरु झाल्याक्षणीच या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी थेट त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने मोठ्या हक्काने धाव घेतली. बिहार, दिल्ली आणि इतरही बऱ्याच ठिकाणहून हे चाहते नित्यक्रमाने शाहरुख दीर्घायुषी होवो... ही 'मन्नत' करताना दिसले. 

आपल्यावर नि:स्वार्थ प्रेम करणाऱ्या या चाहत्यांचा उत्साह पाहून ५४वा वाढदिवस सादरा करणाऱ्या शाहरुखनेही या सर्व 'जबरा फॅन्स'ना हात उंचावत अभिवादन केलं, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. शाहरुख येताच तेथे उपस्थित सर्वच चाहत्यांनी एकच कल्ला करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान, मोठे बॅनर म्हणू नका किंवा किंग खानचं छायाचित्र असणारं टी- शर्ट, शक्य त्या सर्वच मार्गांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याचा दिवस आणखी खास करण्यासाठीचा चाहत्यांचा प्रयत्न आणि शाहरुखवर असणारं त्यांचं प्रेम हेच त्याचं कलाविश्वातील मोठेपणही सांगून गेलं. 

शाहरुखसाठी बऱ्याच वेळापासून त्याच्या निवासस्थानाबाहेर प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांनी तो समोर येताच 'हॅप्पी बर्थडे टू यू...' असं गात त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बराच वेळ त्याने सर्वांच्याच शुभेच्छांचा स्वीकार केला. चाहत्यांच्या आवाजाचा आणि उत्हासाचा आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत शाहरुखने चाहत्यांना शांतता पाळत सुखरुप घरी जाण्यासही सांगितलं. एका कलाकाराप्रती चाहत्यांचं हे अमाप प्रेम दरवर्षी पाहायला मिळतं. किंबहुना या प्रेमात दरवर्षी वाढच होत असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khan waves at fans who have gathered outside his residence, 'Mannat' on his 54th birthday

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: