'या' चित्रपटात दिसणार शाहरुख खान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

बॉलीवूडचा किंग अशी ओळख असणा-या शाहरुख खानचा गेले बरेच दिवस कोणताही नवा चित्रपट आलेला नाही.

मुंबई : बॉलीवूडचा किंग अशी ओळख असणा-या शाहरुख खानचा गेले बरेच दिवस कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. सध्या त्याच्या नव्या चित्रपटाची सारेच आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच किंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात शाहरुख झळकणार आहे. या चित्रपटात तो एक पाहुणा कलाकार म्हणून काम करताना दिसणार आहे. लवकरच या चित्रपटासाठीच्या चित्रीकरणाला तो सुरुवात करेल. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय बिग बी अमिताभ बच्चनही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

शाहरुखला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना ‘ब्रम्हास्त्र’च्या निमित्ताने मिळणार आहे.

web title : Shah Rukh Khan will appear in this movie 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khan will appear in this movie