शाहरूखचा बौआसिंग उद्या येतोय..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

उद्या हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने #ZeroTomorrow हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. 

मुंबई : किंग खानचा बहुप्रतिक्षित 'झिरो' हा चित्रपट उद्या (ता. 21) प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझर व ट्रेलरनेच 'झिरो'ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने #ZeroTomorrow हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. 

चित्रपटामध्ये शाहरुख एका बुटक्‍या माणसाच्या भूमिकेत आहे. 'झिरो'चं पहिले पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर या चित्रपटाची आणि शाहरुखच्या भूमिकेची ऑनलाईन विश्‍वात प्रचंड चर्चा झाली. व्हीएफएक्‍सचा वापर, शाहरुखचा भन्नाट 'लूक' आणि अनुष्काचा वेगळा अवतार यामुळे 'झिरो'चा ट्रेलर अवघ्या काही तासांमध्येच 'हिट' झाले होते. 'झिरो'चं संगीत अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीचे आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले 'झिरो'मधील 'इसकबाजी' हे गाणे सोशल मीडियावर हिट झाले होते. तसेच हा चित्रपट मधल्या काही काळ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण त्याही अडचणीतून बाहेर पडून प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. या सगळ्या गोष्टींमुळे 'झिरो' कसा 'हिरो' असेल याकडे शाहरूखच्या चाहत्यांसोबतच सर्व प्रेक्षकांच्या नजरा 'झिरो'कडे लागल्या आहे.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khans Bauua singh ready to rock as Zero to hit theaters tomorrow