'अबराम कडून काय शिकलास?' रितेशच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

Shah Rukh Khan’s best responses to ritesh on his recent #AskSRK session
Shah Rukh Khan’s best responses to ritesh on his recent #AskSRK session

मुंबई : बॉलिवूडमध्ये सतत काहीतरी घडत असतं. सर्व कलाकार हे सोशल मीडियावर अॅक्टीव असतात आणि या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. कधी सोशल मीडियावर सेलिब्रिटींमध्येही कोल्ड वॉर सुरु असतो. तर, कधी हीच मंडळी एकमेकांची मजा घेत असतात. बॉलिवूडचा किंगखान म्हणजेच शाहरुखला रितेशने एक प्रश्न विचारला आहे. जाणून घ्या शाहरुखने त्याला काय उत्तर दिलयं.

गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा नवा चित्रपट आलेला नाही. शिवाय त्याचे अनेक चित्रपट हे बॉक्सऑफिसवर खास कमाल करु शकले नाहीत. पण, तरीही शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. सध्या शाहरुखने ट्विटरवर #AskSRK असा हॅशटॅग सुरु केला आहे. यातून चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देतो. रितेशनेही त्याला एक प्रश्न विचारला. ट्विट करताना रितेशने विचारले, ''अबरामकडून तू काय शिकलास?''. हजरजबाबीपणे उत्तर देत शाहरुख म्हणाला, '' जेव्हा तुम्ही दु:खी, रागावलेले किंवा भूकेले असता. अशा वेळी मन मोकळं करण्यासाठी आवडता व्हिडीओ गेम खेळता खेळता थोडसं रडून घ्यायचं.''

या रिप्लायला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटने कौतुक केलं आहे.शाहरुखचा मागिल वर्षी कोणताही चित्रपट आला नाही. 2018 मध्ये तो 'झिरो' चित्रपटातून दिसला आणि या सिनेमानेही बॉक्सऑफिसवर खास कमाल केली नाही. त्याचा वावर कमी झाल्यानेच सध्या चाहतेही काळजीत आहेत. यावर्षी तरी तो मोठ्या पडद्यावर दिसेल अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com