'रईस' शाहरुखची "राज'नीती यशस्वी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई : आगामी रईस चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता शाहरुख खान याने रविवारी (ता. 11) रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी "रईस'च्या प्रदर्शनाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रईस प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध तीव्र केला. करण जोहरच्या "ऐ दिल है मुश्‍कील' या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्या समावेशामुळे मनसेने चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला. शाहरुख खान निर्मित रईस चित्रपटातही पाकिस्तानी कलाकार माहिरा खानचा समावेश आहे. त्यामुळे त्याला मनसेकडून विरोध होऊ शकतो, याची जाणीव असल्याने शाहरुखने राज ठाकरे यांच्या निवासाकडे धाव घेतली. शाहरुख खान याने राज ठाकरे यांना चित्रपटाबाबत माहिती दिली.

भेटीनंतर राज यांनी प्रसारमाध्यमांसमोर चित्रपटाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. रईसचे चित्रीकरण उरी हल्ल्यापूर्वी झाले आहे. त्यामुळे या चित्रपट प्रदर्शनाला आपला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माहिरा खान भारतात येणार नाही. जोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नसल्याचे शाहरुखने सांगितल्याचेही या वेळी राज यांनी सांगितले.

Web Title: shah rukh rajniti of raees