शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

टीम इ सकाळ
रविवार, 2 जुलै 2017

वेगवेगळ्या आयडिया लढवून बातम्यांमध्ये कसे राहता येईल याकडे शाहरूख खानचं लक्ष असतं. रईस सिनेमावेळी मुंबई ते दिल्ली राजधानी मधून प्रवास करून त्याने धमाका उडवून दिला होता. आता इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनसाठीही तो वेगवेगळ्या आयडीया लढवतोय. 

मुंबई : वेगवेगळ्या आयडिया लढवून बातम्यांमध्ये कसे राहता येईल याकडे शाहरूख खानचं लक्ष असतं. रईस सिनेमावेळी मुंबई ते दिल्ली राजधानी मधून प्रवास करून त्याने धमाका उडवून दिला होता. आता इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनसाठीही तो वेगवेगळ्या आयडीया लढवतोय. 

याचाच एक भाग म्हणून शाहरूख आणि अनुष्का आपल्या सिनेमाचं तिसरं गाणं पबमध्ये लाॅंच करणार आहेत. 3 जुलै अशी याची तारीख ठरली असून, बीच बीच मे असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे पबमध्ये धमाल आणणारे असल्यामुळे मुंबईच्या पबमध्ये हे गाणे वाजवण्यात येणार आहे. या गाण्यावर शाहरूख आणि अनुष्काने धमाल नृत्यही केलं आहे. मुंबईच्या विविध पबची रेकी केल्यानंतर एक पब या गाण्याच्या प्रकाशनासाठी निवडण्यात येईल आणि तिथे हे गाणे लोकार्पण होईल अशी माहिती 'जब हॅरी..' च्या टीमने दिली. 

Web Title: shaharukh khan anushka sharma new film esakal news