लखनौमध्ये शाहरूख पान फक्त 35 रूपये

टीम ई सकाळ
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सध्या शाहरूख खान प्रमोशनच्या निमित्ताने भारतभर फिरतोय. सध्या तो आणि अनुष्का लखनौला गेले होते. तिथे गेल्यावर शाहरूखला साहजिकच पान खायचा मोह झाला. त्यानंतर त्याने गाठले ते ताम्बुल हे शहरातील सर्वात जुने 70 वर्षांपूर्वीचे पानाचे दुकान. हे दुकान आधी प्रसिद्ध होतेच, पण शाहरूख गेल्यामुळे त्याला आणखी चार चांद लागले. 

मुंबई : सध्या शाहरूख खान प्रमोशनच्या निमित्ताने भारतभर फिरतोय. सध्या तो आणि अनुष्का लखनौला गेले होते. तिथे गेल्यावर शाहरूखला साहजिकच पान खायचा मोह झाला. त्यानंतर त्याने गाठले ते ताम्बुल हे शहरातील सर्वात जुने 70 वर्षांपूर्वीचे पानाचे दुकान. हे दुकान आधी प्रसिद्ध होतेच, पण शाहरूख गेल्यामुळे त्याला आणखी चार चांद लागले. 

या दुकानात गेल्यावर शाहरूखने मीठा पान मागवले. त्या दुकानदारानेही त्याच्यासाठी खास पान बनवले. या पानाचे नाव शाहरूख असेच ठेवण्यात आले आहे. हे स्पेशल पान करून शाहरूखला भरवण्यात आले. त्यावेळी अनुष्काही हजर होती. त्यानंतर शाहरूख पान खायला गर्दी उसळली. या पानाची किंमत आता 35 रुपये करण्यात आली आहे. शाहरूखने खल्लेले पान खाण्यासाठी आता तिथे रांग लागते हे वेगळे सांगायला नको. 

Web Title: Shaharukh khan lakhanau tambul esakal news

टॅग्स