बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान करतोय त्याच्या आगामी सिनेमाची जोरदार तयारी..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

बॉलीवूचा किंग खान शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक खुषखबर आहे..लवकरंच शाहरुख त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करताना दिसेल...

बॉलीवूचा किंग खान शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक खुषखबर आहे..लवकरंच शाहरुख त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करताना दिसेल...शाहरुख खान राजकुमार हिरानी यांच्या आगामी सिनेमात झळकू शकतो..शाहरुखची रेड चिलीज ही निर्मितीसंस्थाच या सिनेमाची निर्मिती करणार असून पहिल्यांदाच राजकुमार हिरानी विधू विनोद चोप्रा यांच्या बॅनरशिवाय सिनेमा करणार आहेत..या सिनेमाचं शूटींग लवकरंच सुरु होणार असून या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल याची उत्सुकता आहे..

Image result for rajkumar hirani srk

सुत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा लंडन, कॅनडा आणि गुजरातमध्ये शूट होणार असून या सिनेमात काजोल आणि करिना यांची झलकही दिसू शकते..या दोघांची शाहरुखसोबत असलेली केमस्ट्री प्रेक्षकांना याआधीही भावलीये..त्यामुळे आता शाहरुखची हिरोईन कोण असणार आणि शाहरुख या सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी कोणता नवीन प्रयोग करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल..

हे ही वाचा :10 वर्ष संसार करुन बॉलीवूडची 'ही' जोडी घेतेय घटस्फोट

झिरो या सिनेमानंतर शाहरुखच्या आगामी सिनेमाची कुठेच चर्चा नव्हती...बॉक्स ऑफीसवर झिरो फारशी कमाल करु शकला नसला तरी शाहरुखचे चाहते मात्र त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहतायेत..

किंग खानच्या चाहत्यांना सांगायचं झालं तर यासिनेमाव्यतिरिक्त शाहरुख शेरशाह सिनेमात कॅमिओ करताना दिसेल..कारगिल युद्धातील हिरो विक्रम बत्रा यांच्या सत्य घटनेवर आधारित असलेल्या या बायोपिकमध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा डबल रोल असणारे...त्यामुळे शाहरुखचा कॅमिओ यात महत्वाची भूमिका साकारेल हे नक्की..

shaharukh khan will be seen in rajkumar hiranis next film


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shaharukh khan will be seen in rajkumar hiranis next film

Tags
टॉपिकस
Topic Tags: