नेमबाज शाहिद 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

भूमिका वास्तवात उतरवण्यासाठी कलाकार त्या भूमिकेशी निगडित असणाऱ्या गोष्टीचं रीतसर प्रशिक्षण घेऊन मगच ती भूमिका साकारताना दिसतात. अभिनेता शाहिद कपूरनेही विशाल भारद्वाजचा आगामी चित्रपट "रंगून'साठी नेमबाजीचं ट्रेनिंग घेतलंय. यात शाहिद तगड्या फायटर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बंदुकीने योग्य निशाणा साधण्यासाठी शाहिदने सुवर्णपदक विजेत्या नेमबाजाकडून ट्रेनिंग घेतलंय. या सिनेमासाठी शाहिद कपूरने प्रसिद्ध नेमबाज आणि 2006 मध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये 25 मीटर स्टॅण्डर्ड पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविणाऱ्या रौनक पंडितकडून नेमबाजीचे धडे गिरवलेत.

भूमिका वास्तवात उतरवण्यासाठी कलाकार त्या भूमिकेशी निगडित असणाऱ्या गोष्टीचं रीतसर प्रशिक्षण घेऊन मगच ती भूमिका साकारताना दिसतात. अभिनेता शाहिद कपूरनेही विशाल भारद्वाजचा आगामी चित्रपट "रंगून'साठी नेमबाजीचं ट्रेनिंग घेतलंय. यात शाहिद तगड्या फायटर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बंदुकीने योग्य निशाणा साधण्यासाठी शाहिदने सुवर्णपदक विजेत्या नेमबाजाकडून ट्रेनिंग घेतलंय. या सिनेमासाठी शाहिद कपूरने प्रसिद्ध नेमबाज आणि 2006 मध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये 25 मीटर स्टॅण्डर्ड पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविणाऱ्या रौनक पंडितकडून नेमबाजीचे धडे गिरवलेत. त्याने रौनकसोबत वरळीतील शूटिंग रेंजमध्ये कित्येक तास सराव केला आणि काही कालावधीतच शाहिद नेमबाजीत तरबेजही झाला.  

Web Title: Shahid kapoor