
शाहिदनं आपल्या पत्नीविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, त्याची पत्नी मीरा त्याच्यावर भलतीच नाराज झाली आहे.
मुंबई - बॉलीवूडमध्ये जे काही अप्रतिम डान्सर आहेत त्यात अभिनेता शाहिद कपूरचे नाव घ्यावे लागेल. त्यानं सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपट असे केले की, त्यात त्याचा डान्स सर्वांच्या पसंतीस पडला आहे. पुढे त्याच्य़ा वाट्याला थोड्या गंभीर स्वरुपाच्या भूमिका आल्या त्यानं त्या उत्कृष्टपणे निभावल्या. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. मागील वर्षी त्याच्या कबीर सिंग नावाच्या चित्रपटानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. साऊथच्या अर्जुन रेड्डी नावाच्या चित्रपटाचा हा रिमेक होता.
शाहिदनं आपल्या पत्नीविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, त्याची पत्नी मीरा त्याच्यावर भलतीच नाराज झाली आहे. याचे कारणही त्यानं सांगितले आहे. ते म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून तो जे चित्रपट करत आहे ते कमालीचे गंभीर स्वरुपाचे आहेत. एक तर बायोपिक आहेत किंवा आणखी वेगळ्या विषयांवरचे त्याचा मीराला कंटाळा आला आहे. त्यामुळे तिनं शाहिदला ओरडून सांगितले आहे की आता जरा ट्रॅक बदल. यावर शाहिदनं मी काय करावे, मला माझ्या पत्नीपासून वाचवा यासाठी चाहत्यांकडे मदत मागितली आहे. आपली यातून सुटका करावी असे त्यानं म्हटले आहे.
मीरा नाराज झाल्य़ानंतर शाहिदनं सोशल मीडियावर ती पोस्ट शेयर करुन फॅन्सकडे मदत मागितली आहे. त्यानं लिहिले आहे की, माझी पत्नीनं मला खूप झापलं आहे कारण मी कुठलीही मस्तीखोर मुव्ही करत नाही. ज्यात मी डान्स करताना दिसेल. तुम्हा सर्वांना माझ्याकडून ओपन इनव्हिटेशन आहे की तिला मनविण्यासाठी मी काय करु, आता एका हिरोची गरज आहे. अशी पोस्ट शेयर केली आहे. शाहिद आणि मीरा हे एक प्रसिध्द जोडपं आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. ते नेहमीच एकमेकांची टिंगल टवाळी करताना दिसून आले आहेत.
movie review ; सरकारी 'कागज'चा अनुभव तुम्ही घेतलाय का? एकदा तरी बघावाच हा मुव्ही'
शाहिदच्या पत्नीनं व्यक्त केलेली इच्छा येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. शाहिद यापुढे जर्सी नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. तो चित्रपटही साऊथच्या एका चित्रपटावर आधारित असणारा चित्रपट आहे. 2019 मध्ये तेलगू भाषेत जर्सी नावाचा चित्रपट आला होता. जर्सी मध्ये शाहिद कपूरच्या बरोबर मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी दिसणार आहे.