शाहिद कपूर विषयी केआरकेची भविष्यवाणी.. म्हणाला,'याचं करिअर आता..'KRK Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK Tweet On Shahid Kapoor

KRK Tweet: शाहिद कपूर विषयी केआरकेची भविष्यवाणी.. म्हणाला,'याचं करिअर आता..'

KRK Tweet: शाहिद कपूरनं 'फर्जी' सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. आता आपल्या आगामी 'ब्लडी डॅडी' साठी शाहिद सज्ज झाला आहे. हा सिनेमा जियो वर रिलीज होत आहे. एप्रिलमध्ये शाहिदच्या 'ब्लडी डॅडी' सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केलं गेलं होतं,आणि तो पाहून चाहते भलतेच उत्सुक झाले होते.

आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचा अॅक्शन अवतार सर्वांना खूपच आवडला आहे. पण आता केआरकेला शाहिदच्या या लूकमध्ये पुन्हा काहीतरी खटकलं आहे,आणि त्यानं अभिनेत्याची जोरदार खिल्ली उडवली.(Shahid Kapoor Bloody Daddy trailer release krk trolled shahid kapoor)

स्वघोषित समिक्षक कमाल रशिद खान नेहमीच बॉलीवूड सिनेमे आणि सेलिब्रिटींवर टीका करताना दिसतो. त्याला प्रत्येक सिनेमावर मत व्यक्त करताना आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. यामुळे अनेकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावरही असतो.

आता एका लेटेस्ट ट्वीटमध्ये केआरकेनं शाहिद कपूरची चांगलीच खिल्ली उडवली आहे. केआरकेनं लिहिलं आहे,''JioCinema वर शाहिदचा नवा सिनेमा #BloodyDaddy स्ट्रीम होणार आहे. मग लोक त्याच्या कोणत्या सिनेमाला थिएटरमध्ये पाहण्यासाठी तिकिट का खरेदी करतील? मला तर वाटतं शाहिदचं करिअर आता संपलं आहे. त्याच्या पुढच्या सिनेमाला सिनेमागृहात १ करोडची देखील ओपनिंग मिळणार नाही''.

'ब्लडी डॅडी' ट्रेलर लॉंचला शाहिद कपूरनं सिनेमाच्या अॅक्शन सीन्स विषयी संवाद साधला. शाहिद म्हणाला,''सिनेमात अॅक्शन एकदम खतरनाक आहे. या सिनेमाचा विषय खूप इंट्रेस्टिंग आहे. सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्स हातात हात घालून दिसतील''.

अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूरसोबत रोनित रॉय,डायना पेंटी,संजय कपूर,राजीव खंडेलवाल,अंकूर भाटिया असे कलाकार आहेत. सिनेमा ९ जून २०२३ रोजी Jio Cinema वर रिलीज होत आहे.