Farzi: शाहिद कपूरच्या 'फर्जी'ने 'मिर्झापूर'लाही टाकले मागे, बनली सर्वाधिक पाहिली जाणारी सिरीज

शाहिद कपूरच्या फर्जीने आणखी एक नवा विक्रम केला आहे. ही सिरीज OTT वर आतापर्यंत सर्वात जास्त पाहिली जाणारी भारतीय वेब सिरीज बनली आहे.
shahid kapoor
shahid kapoorSakal

शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची ओटीटी डेब्यू सिरीज 'फर्जी' चांगलीच गाजली आहे. त्याचबरोबर या सिरीजने एक नवा टप्पा गाठला आहे. अंदाजे एकूण 37 दशलक्ष दर्शकांसह, ही सिरीज आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय वेब सिरीज बनली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या फर्जीमध्ये, कपूरने स्ट्रीट-स्मार्ट गुन्हेगाराची भूमिका केली होती, तर सेतुपती ट्रिगर-हॅपी कॉपच्या भूमिकेत दिसला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 'फर्जी' या आठवड्यात भारतात सर्वाधिक पाहिलेल्या मूळ SVOD (सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन डिमांड) सिरीजच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

याने अजय देवगणची डिस्ने+ हॉटस्टार मालिका 'रुद्र' (35.2 दशलक्ष प्रेक्षक), पंकज त्रिपाठीची 'मिर्झापूर सीझन 2' (32.5 दशलक्ष प्रेक्षक), जितेंद्र कुमारची 'पंचायत 2' (29.6 दशलक्ष दर्शक), पंकज त्रिपाठीची डिस्ने+ हॉटस्टार सिरीज 'क्रिमिनल जस्टिस' (29.1 दशलक्ष प्रेक्षक) आणि आदित्य रॉय कपूरची नुकतीच रिलीज झालेली थ्रिलर सिरीज 'द नाईट मॅनेजर' (27.2 दशलक्ष प्रेक्षक) यांना मागे टाकले आहे.

shahid kapoor
Ponniyin Selvan 2 : प्रतिक्षा संपली! 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर

फर्जीने फेब्रुवारीमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंग सुरू केले. या सिरीजमध्ये शाहिद कपूर व्यतिरिक्त विजय सेतुपती, राशि खन्ना, केके मेनन, रेजिना कॅसांड्रा, झाकीर हुसैन, भुवन अरोरा, अमोल पालेकर आणि कुब्ब्रा सैत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रिलीज झाल्यानंतर या सिरीजला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com