
Holi Wishes 2023: 'रंग किसने लगाया..', कबीर सिंह पुन्हा होळी मुडमध्ये..पण आता जरा ट्विस्ट...Video Viral
आज सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूडमधील कलाकारही होळीच्या रंगात रंगलेल दिसत आहेत. कालाकार सोशल मिडियाच्या माध्यामातुन आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत.तसेच काल सर्व कलाकारांनी आपआपल्या घरी होळीका दहन केले त्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहेत.
सर्वच कलाकार रंग खेळतांना बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर अजूनही कबीर सिंगच्याच धुंदित आहे.आपल्या लाडक्या चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याने एक व्हिडिओ पोस्च केला आहे. होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहिद कपूर पुन्हा एकदा कबीर सिंग झाल्याचं दिसतयं.
शाहिदने कबीर सिंग मधला मोस्ट फेमस बाइक सीनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने शेवटी लिहिले की, "काही नाही भाई... फक्त होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे."
आता शाहिद कपूरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी लाईक आणि कमेंट केली आहे. या व्हिडिओसोबत शाहिद कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "होळीचा मूड...
शाहिद कपूरची ही डॅशिंग स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. कबिर सिंह मधला हा सीन त्यावेळीही प्रेक्षकांना खुपच आवडला होता. त्याचे बरेच मीम्सही तयार झालेलेल आहेत. आता त्यातच त्याने पुन्ह हा व्हिडिओ पोस्च केल्यामुळं त्याचे चाहते कॉमेंट बॉक्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
शाहिद कपूरच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले - 'कुठं गेलं तुझं प्रेम', तर दुसऱ्या यूजरने कमेंट करताना लिहिले - 'हे आतापर्यंतच्या सर्वात मजेदार होळीची शुभेच्छा, हॅपी होली', एका यूजरने लिहिले 'आता कुणाला मारण्याची गरज नाही. तिनं लग्न केले आहे' तर काहींनी त्याला प्रितीच्या नावानेही चिडवलं आहे.