शाहिद कपूरचे प्रोटीन डाएट 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

शाहिद कपूर सध्या "पद्मावती'च्या शूटिंगमध्ये चांगलाच बिझी आहे. पण या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेतोय. या चित्रपटात तो राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे; पण आता या चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग सुरू होणार आहे. त्याला त्यासाठी वजन वाढवायचे आहे. तो सध्या त्यासाठी जबरदस्त डाएट करतोय आणि जिममध्येही जातोय. त्याचा जिम ट्रेनरही त्याच्यावर मेहनत घेत आहे. त्याचे म्हणणे आहे, की शाहिद शाकाहारी असल्यामुळे त्याच्या वजनवाढीसाठी वेळ लागतोय. पण तो पूर्णपणे प्रोटीन डाएटवर आहे. त्यामुळे त्याचे असे म्हणणे आहे की, शाकाहारी माणूसही वजन वाढवू शकतो.

Web Title: shahid kapoor protin diet

टॅग्स