
Shahid Kapoor: 'कबीर सिंग' की 'उडता पंजाब'? शाहिदच्या मुलांनी पप्पांचा कोणता चित्रपट पाहिला?
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूरचं नावं घेतलं तर डोळ्यासमोर येतात ती त्याची दोन रुप.. एक तर 'विवाह' आणि 'जब वी मेट' मधला कुल आणि चॉकलेट बॉय तर दुसरीकडे 'आर राजकुमार' आणि 'कबीर सिंग'मधला रावडी लुकमधला शाहिद. त्याची क्रेझ ही त्यावेळीही होती आणि आजही तितकीच आहे. त्याच्या फर्जी या वेबसिरिजलाही चाहत्यांची भरभरुन प्रतिसाद मिळाला.
तर आता शाहिद कपूर त्याच्या 'ब्लडी डॅडी' या सिनेमामुळ चर्चेत आहे. त्याची आगामी ओटीटी सिरिज 'ब्लडी डॅडी'च्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.
या चित्रपटातून शाहिद पहिल्यांदाच दिग्दर्शक अली अब्बाससोबत काम करताना दिसणार आहे. आता अलीकडेच, प्रमोशन दरम्यान, शाहिदने त्याच्या वयक्तिक आयूष्याबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. त्याची मुल त्याचे सिनेमे पाहतात का या प्रश्नावर त्यानं उत्तर दिलयं.
त्याचे चित्रपट मुलांना दाखवण्याबद्दल त्याने सांगितले की, मीशा आणि झैन यांना त्याचे चित्रपट दाखवायला शाहिदला आवडत नाही.
मुले जेव्हा त्याला पडद्यावर पाहतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असते. याला उत्तर देताना शाहिद म्हणाला की त्याला स्वत:चे चित्रपट त्यांना दाखवायला जास्त आवडत नाहीत.
त्यामुळे पहिल्या दिवशी त्याच्या मुलांचा हा पहिला प्रश्न होता की लोक तुमच्याकडे का येतात? कारण त्यांनी तोपर्यंत शाहिदचे चित्रपट पाहिले नव्हते. त्यांनी नुकताच शाहिदचा 'जब वी मेट' पाहिला.
पहिल्यांदाच शाहिदची आई आणि पत्नी मुलांना घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. याबद्दल मीरानं त्याला सांगितले होत की, 'हा असा चित्रपट आहे जिथे तू लोकांना मारत नाहीस किंवा असं काही करत नाहीस जे लोकांना आवडत नाही. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. म्हणूनच त्यानी जाऊन तो बघावा अशी माझी इच्छा आहे.
शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, शाहिद कपूर शेवटचा राज आणि डीकेच्या क्राईम थ्रिलर सिरिज 'फर्जी' मध्ये दिसला होता.
यापूर्वी त्याने 'जर्सी' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये त्याने क्रिकेटरची भूमिका केली होती.
शाहिद कपूर 'उडता पंजाब', 'हैदर', 'जब वी मेट', 'पद्मावत' आणि 'इश्क विश्क' सारख्या अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.