शाहिद अजूनही आहे बायकोच्या मागे लट्टू, म्हणाला,'माझ्या बोयकोसारखं...'

हे जोडपं एकमेकांचं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही.
Shahid kapoor Showered his love form a comment on Mira's recent post on instagram
Shahid kapoor Showered his love form a comment on Mira's recent post on instagramesakal

अभिनेता शाहीद आणि मीराचं एकमेकांवरचं प्रेम काही चाहत्यांपासून लपलेलं नाहीच.शाहीद आणि मीरा एकमेकांवरच्या प्रेमाची कबूली उघडपणे देतच असतात.बी टाऊनमधील चर्चेत असणाऱ्या जोडप्यांमधे शाहीद आणि मीराचंही नाव कायम चर्चेत असते.त्यातही हे जोडपं एकमेकांचं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही.

मीरा कपूरनं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केलाय.मीराच्या या फोटोवर शाहीदच्या प्रेमाचा वर्षाव झालेला दिसते.(Shahid Kapoor)तुझ्यासारखं सुंदर कोणीच नाही असा कमेंट शाहीदनं मीराच्या या फोटोवर केलाय.मीराच्या या फोटोवर शाहीदबरोबरच नेटकऱ्यांच्याही कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसतो.

मीरा कपूरचा(Mira Kapoor) फिल्म इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड नसला तरी मीरा कुठल्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो फॅन्स आहेत.मीराच्या लेटेस्ट इन्स्टा फोटोमधे मीरानं निळ्या रंगाचं टॉप आणि काळ्या रंगाचं स्कर्ट घातलं आहे.मीराने घरचं डायनिंग सजवताना हा फोटो काढलेला दिसतो.

शाहीद आणि मीराचं २०१५ मधे लग्न झालं.या जोडप्याला बघून यांचं अरेंज मॅरेज असण्यावर अनेकांचा विश्वास नाही.पण मात्र लग्नाआधी या दोघांची भेट कुटुंबियांमुळे झाली होती.त्यानंतर काही भेटींनंतर या दोघांचं लग्न झालं.या जोडप्यास दोन अपत्ये आहेत.मुलगी मिशा आणि मुलगा झैन या दोघांचेही फोटोज सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com