शाहरूख बन गया जादूगर... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

जवळपास 15 वर्षांनंतर बॉलीवूडचा किंग खान शाहरूख व दबंग खान सलमान एकाच चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघे 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या "हम तुम्हारे है सनम' सिनेमात एकत्र दिसले होते. त्यापूर्वी "ओम शांती ओम'मध्ये सलमान व शाहरूख काही सेकंदांसाठी एकत्र पाहायला मिळाले होते आणि त्याहीपूर्वी "करण अर्जुन'मध्ये ते एकत्र होते. आता ते दोघे "ट्युबलाइट' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सलमानच्या या चित्रपटात शाहरूख "केमिओ' करणार असला तरी त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पाहुणा कलाकार शाहरूख "ट्युबलाईट'मध्ये जादूगाराची भूमिका साकारणार आहे.

जवळपास 15 वर्षांनंतर बॉलीवूडचा किंग खान शाहरूख व दबंग खान सलमान एकाच चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघे 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या "हम तुम्हारे है सनम' सिनेमात एकत्र दिसले होते. त्यापूर्वी "ओम शांती ओम'मध्ये सलमान व शाहरूख काही सेकंदांसाठी एकत्र पाहायला मिळाले होते आणि त्याहीपूर्वी "करण अर्जुन'मध्ये ते एकत्र होते. आता ते दोघे "ट्युबलाइट' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सलमानच्या या चित्रपटात शाहरूख "केमिओ' करणार असला तरी त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पाहुणा कलाकार शाहरूख "ट्युबलाईट'मध्ये जादूगाराची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात होतं की सुरुवातीला या सिनेमात शाहरूखसाठी कोणतीही भूमिका नव्हती. मात्र सल्लूमियॉंच्या सांगण्यानुसार किंग खानला या प्रोजेक्‍टशी जोडण्यात आलं. दिग्दर्शक कबीर खान यांना फक्त नावासाठी शाहरूखला या चित्रपटात घ्यायचं नव्हतं. मग त्यांनी कथेत फेरबदल करून शाहरूखच्या भूमिकेची लांबी वाढवली. तसंच, "ट्युबलाईट'मधील एका गाण्यात सलमान व शाहरूख एकत्र डान्स करणार असंही बोललं जातंय. 

Web Title: shahrukh and salman khan tubelight