शाहरूख म्हणाला, 'जगावं की मरावं?', तर अनुष्काने 'शिकवला धडा'

टीम ई सकाळ
सोमवार, 31 जुलै 2017

सध्या झी मराठीवर गाजतोय तो चला हवा येऊ द्या हा शो. या शोमध्ये आज सोमवारी शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा येणार आहेत. विशेष बाब अशी की जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही टीम येणार असली तरी यावेळी शाहरूखने नटसम्राटमधील टू बी आॅर नाॅट टु बी हे स्वगत म्हणून दाखवले. तर अनुष्काने ती फुलराणीमधील तुला शिकवेन चांगलाच धडा हा प्रवेश सादर केला.

मुंबई : सध्या झी मराठीवर गाजतोय तो चला हवा येऊ द्या हा शो. या शोमध्ये आज सोमवारी शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा येणार आहेत. विशेष बाब अशी की जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही टीम येणार असली तरी यावेळी शाहरूखने नटसम्राटमधील टू बी आॅर नाॅट टु बी हे स्वगत म्हणून दाखवले. तर अनुष्काने ती फुलराणीमधील तुला शिकवेन चांगलाच धडा हा प्रवेश सादर केला.

शाहरूख खानने सादर केलेला नटसम्राट

शाहरूखने अत्यंत प्रयत्नपूर्वक नटसम्राटमधील स्वगत म्हणून दाखवला. तर अनुष्कानेही तुझ्या पापाचा भरलाय घडा हे स्वगत म्हणून दाखवला. उपस्थितांनी याला जोरदार दाद दिली. सोमवार आणि मंगळवारी येणाऱ्या चला हवा येऊ द्यामध्ये हा कार्यक्रम पाहता येईल. 

अनुष्काने सादर केलेली फुलराणीची झलक

Web Title: shahrukh khan anushka sharma CHYD esakal news