'त्यांनी माझ्यापेक्षा अधिक फेमस होऊ नये असं कायम वाटतं',सलमान,अक्षय नाही तर मग कोणाविषयी बोलला शाहरुख?Shahrukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan

SRK: 'त्यांनी माझ्यापेक्षा अधिक फेमस होऊ नये असं कायम वाटतं',सलमान,अक्षय नाही तर मग कोणाविषयी बोलला शाहरुख?

Shahrukh Khan: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या 'पठाण' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. त्याचा सिनेमा ना केवळ भारतीय सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरच कमाई करतोय तर जगभरात धुमाकूळ घालतोय. यादरम्यान शाहरुख खाननं आपल्या चाहत्यांसोबत ASk Me Anything सेशन ठेवलं होतं. त्यात चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारत भंडावून सोडले.(Shahrukh Khan ask srk anything session fans want to know about king khan pet)

एका चाहत्यानं विचारलं की, 'तुम्हाला पाळीव प्राणी आवडतात का?तुमच्याकडे एकही पेट का नाही?'

या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला,''माझ्या घरी खूप पेट्स आहेत. फक्त मी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाही...कारण तिथे त्यांना माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्धि मिळावी असं मला मुळीच वाटत नाही''.

आणखी एका चाहत्यानं शाहरुख खानला त्याच्या एका विचित्र सवयीविषयी विचारलं.

तेव्हा उत्तर देताना किंग खान म्हणाला, ''तो एकाच गोष्टीविषयी अनेकदा तेच तेच बोलतो..ते त्याला आणि अनेकदा दुसऱ्यांनाही त्रासदायक ठरते''.

शाहरुख खान लवकरच साऊथ स्टार नयनतारासोबत 'जवान' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २ जून,२०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. या वर्षात २२ डिसेंबरला शाहरुखचा 'डंकी' सिनेमा रिलीज होत आहे.