शाहरूख बनणार अंतराळवीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा सिलसिला सुरू अाहे. अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिकही येतोय.

शर्मा यांची मुख्य भूमिका कोण साकारणार त्याबाबत उत्सुकता होती. परफेक्‍शनिस्ट आमिर खान लीड रोलमध्ये असल्याची चर्चा अगदी सुरुवातीपासूनच होती; पण आता किंग खान शाहरूखचं नाव पुढे आलंय. आमिरने आपल्या बिझी शेड्युलमुळे बायोपिक नाकारल्याने त्याच्या जागी शाहरूखची वर्णी लागली. शाहरूखला विचारणा होताच त्याने तत्काळ आपला होकार कळवला.

‘सारे जहाँ से अच्छा’ असं चित्रपटाचं नाव असून महेश मथई त्याचे दिग्दर्शक आहेत. सध्या तरी शाहरूख त्याच्या ‘झिरो’ चित्रपटात गुंतला आहे. त्याचं चित्रीकरण आटोपल्यावरच तो बायोपिककडे वळणार आहे. शर्मा यांचा खडतर प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शाहरूखबरोबरच भूमी पेडणेकर, राणी मुखर्जी आदींच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahrukh Khan Astronauts