शाहरूखचा जुन्या आठवणींना उजाळा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

शाहरूखचा "दिल स'े मधला "छैय्या छैय्या' डान्स अजूनही सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. ट्रेनच्या टपावर केलेला हा डान्स त्यावेळी इतका फेमस झाला की त्यामुळे शाहरूखला वेगळी ओळख मिळाली. आता तब्बल 19 वर्षांनंतर त्याच्या रईस चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने मुंबई ते दिल्ली हा प्रवास ट्रेनने केला. आणि त्याच्या ट्रेनच्या आठवणी आठवणी ताज्या झाल्या. त्याने नुकतेच सांगितले की, "छैय्या छैय्या गाण्यात मला सोडून नाचणाऱ्या सगळ्या सह कलाकारांना सेफ्टीसाठी ट्रेनला दोरीने बांधलेले होते. मला उड्या मारायच्या होत्या त्यामुळे तसे करता आले नाही.

शाहरूखचा "दिल स'े मधला "छैय्या छैय्या' डान्स अजूनही सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. ट्रेनच्या टपावर केलेला हा डान्स त्यावेळी इतका फेमस झाला की त्यामुळे शाहरूखला वेगळी ओळख मिळाली. आता तब्बल 19 वर्षांनंतर त्याच्या रईस चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने मुंबई ते दिल्ली हा प्रवास ट्रेनने केला. आणि त्याच्या ट्रेनच्या आठवणी आठवणी ताज्या झाल्या. त्याने नुकतेच सांगितले की, "छैय्या छैय्या गाण्यात मला सोडून नाचणाऱ्या सगळ्या सह कलाकारांना सेफ्टीसाठी ट्रेनला दोरीने बांधलेले होते. मला उड्या मारायच्या होत्या त्यामुळे तसे करता आले नाही. ट्रेन स्लो होती पण जेव्हा मधे मधे ओव्हर हेड ब्रीज होते तेव्हा काहीच दिसायचे नाही. फराह खान आणि बाकीचा क्रू पांढरे फडके घेऊन टपावर बसले होते जेव्हा ते हे फडके फडकवायचे त्याचा अर्थ असा असायचा की गाणे थांबवा आणि खाली वाका कारण पाठून ब्रीज येत असायचा. हे गाणे शूट करणे खूप कठीण होते. पण हा अनुभव खूपच चांगला होता.' 

Web Title: shahrukh khan memories in dil se chaiya chaiya