
Shahrukh Khan च्या 'पठाण' सिनेमात आहे आमिरच्या जवळची 'ही' खास व्यक्ती, कोण आहे निखत हेगडे?
Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमानं बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई करण्यास सुरुवात करत मोठा इतिहास रचला आहे. तब्बल ४ वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखनं मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
'पठाण'नं जवळपास सर्वमिळून ओपनिंग डे ला १००करोडची कमाई केली आहे आणि असं करणारा हा बॉलीवूडचा पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमात शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत. (Shahrukh Khan Movie pathaan actress Nikhat khan hegde aamir khan's sister)
तसंच,सलमान खान देखील सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. हे सगळं तर सिनेमा आपण पाहिला असेल किंवा नसेल तरी आपल्याला माहित असेल. पण तुम्हाला माहित आहे का या सिनेमात आमिर खानची बहिण निखत खान-हेगडे देखील आहे,ज्यांनी सिनेमात शाहरुखच्या मानलेल्या आईची भूमिका केली आहे. तुम्ही 'पठाण' पाहिला असेल आणि आमिरच्या बहिणीला तुम्ही ओळखू शकला नसाल तर चला जाणून घेऊया सिनेमात ती नेमक्या कोणत्या सीनमध्ये दिसत आहे.
आमिर खानची बहिण निखत खान हेगडे 'पठाण' मध्ये शाहरुखच्या मानलेल्या आईची भूमिका साकारताना दिसते आहे. ती एका अफगाणी महिलेची व्यक्तिरेखा साकारत आहे, जिनं शाहरुखला 'पठाण' हे नाव दिलेलं असतं.
सिनेमात शाहरुखची व्यक्तिरेखा अनाथ दाखवण्यात आली आहे. निखत फक्त त्याला आपला मुलगाच म्हणताना दिसत नाही तर त्याच्या दंडावर ताबीजही बांधताना दिसते. या सीनमध्ये दोघं खूप भावूक झालेले देखील दिसतात.

Nikhat Khan Post
निखत खान सोशल मीडियावर खूप सक्रिय पहायला मिळते. ती आपल्या चाहत्यांनी शेअर केलेल्या काही क्लीप इन्स्टाग्रामवर शेअर करताना सध्या दिसत आहे. या क्लीप पठाण सिनेमातील आहेत,ज्यात शाहरुख आणि निखत एकत्र नजरेस पडत आहेत.
निखत खाननं गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ती स्टार प्लसच्या 'बन्नी चाऊ होम डिलीवरी' मालिकेत दिसली होती. तिनं सिनेमात देखील काम केलं आहे.
'मिशन मंगल','तान्हाजी-द अनसंग वॉरियर' आणि 'सांड की आंख' सारख्या सिनेमात ती दिसली आहे. तिनं काही सिनेमांची निर्मिती देखील केली आहे. ज्यात 'लगान', 'हम है राही प्यार के' आणि 'तुम मेरे हो' सारख्या सिनेमांचा समावेश आहे.
'पठाण' विषयी बोलायचं झालं तर हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानं मोठा इतिहास रचला आहे. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या या सिनेमानं जागतिक स्तरावर १००.९६ करोड आतापर्यंत कमाई केलीआहे.