शाहरुख खानचा 'पठान'मधील लूक आला समोर, यशराज स्टुडिओ बाहेर दिसला शाहरुख

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 1 December 2020

किंग खान मुंबईत यशराज स्टुडिओच्या बाहेर दिसून आला. यावेळीही शाहरुखचे लांब केस आणि फ्रेंच दाढी असा वेघळा अंदाज पाहायला मिळाला.

मुंबई- बॉलीवूडचा किंग खान शाहरुख दुबईहून मुंबईला परतला आहे. त्यानंतर पुन्हा तो अलिबागला जाताना दिसून आला होता. दुबई आणि अलिबाग या दोन्ही वेळी जेव्हा तो कॅमेराबंद झाला तेव्हा त्याचा नवा लूक प्रेक्षकांसमोर आला. त्याचा हा लूक पठान या त्याच्या आगामी सिनेमाचा असल्याचं म्हटलं जातंय. नुकताच किंग खान मुंबईत यशराज स्टुडिओच्या बाहेर दिसून आला. यावेळीही शाहरुखचे लांब केस आणि फ्रेंच दाढी असा वेघळा अंदाज पाहायला मिळाला.

हे ही वाचा: राजू श्रीवास्तवच्या वक्तव्याला बकवास म्हणत कृष्णा अभिषेकचंभारती सिंहला समर्थन   

शाहरुखचा यशराज स्टुडिओ बाहेरचा हा लूक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानने त्याचा नवा आगामी सिनेमा पठानवर काम सुरु केलं आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानने एक सफेद टी शर्ट आणि सोबतंच काळ्या रंगाचं लोअर घातलं होतं. त्याचा हा लूक खूप जबरदस्त दिसतोय. लांब केसांमध्ये शाहरुख एकदमव वेगळा दिसतोय. हा लूक खास पठानसाठी तयार केला आहे. 

शाहरुख खान

शाहरुख खान

सोमवारी दीपिका पदूकोणनेही शाहरुखला जॉईन केल्याचं कळतंय. शाहरुखसोबत त्याची को-स्टार दीपिका पदूकोण दिसून येणार आहे सोबत जॉन अब्राहम देखील दिसेल. हा सिनेमा सिद्धार्थ आनंदद्वारे दिग्दर्शित केला जाणार आहे. मात्र अजुनही या सिनेमाची घोषणा शाहरुखने स्वतः केलेली नाही. शाहरुख खान शेवटचा झिरो या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर शाहरुख पहिल्यांदा २ वर्षाच्या मोठ्या गॅपने पठान या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे किंग खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.    

shahrukh khan new look for the film pathan spot outside yash raj studio seephotos  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shahrukh khan new look for the film pathan spot outside yash raj studio seephotos