शाहरूखच्या प्रेमापोटीच रेखाटले चित्र

गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

शाहरुखची आहे फॅन पण ..

शाहरुख चे चाहते त्याला भेटण्यासाठी वाट्टेल ते  करायला तयार असतात पण तुम्हाला असं कळलं की त्याची एक चाहती आहे पण तिला शाहरुख ला भेटायचंच नाही तर ?? आहे ना मजेशीर .. ही चाहती स्वतः एक अभिनेत्री आहे  तिला अनेक वेळा शाहरुख ला मिळण्याची संधी मिळाली पण तिने नाकारली .. कारण आहे तिला माहीत नाही ती शाहरुख ला भेटल्यावर कशी रीऍक्ट होईल ...तर ही आहे झी युवावरील हॉरर मालिका गर्ल्स हॉस्टेल मधली सागरिका म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे.

ही आता जरी अभिनय क्षेत्रात स्वतःच भाग्य अनुभवत असली तरीही तिने आयुर्वेदीक डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आहे.  ( B.A.M.S.) . पण अभिनेत्री होण्याची इच्छा असल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर न होता तिने आपला मार्ग अभिनयकडे वळवला. पूर्णिमा शाहरुख खानची केवळ फॅन नसून शाहरुख तिचे पहिले प्रेम सुद्धा आहे. शाहरुख तिला प्रचंड आवडतो .आयुष्यातील पहिला सिनेमा सुद्धा तिने शाहरुखचा दिवाना  पहिला तेव्हा तिचे वय असेल अवघे 3 वर्ष .इतकेच नव्हे तर लहानपणी डान्स कॉम्पिटीशन मध्ये सुदधा ती केवळ शाहरुखच्या ' ऐसी दिवानगी' या गाण्यांवरच  शाहरुख बनून नृत्य करायची.शाहरुख वरील प्रेमामुळेच हे चित्र सुद्धा तिने केवळ दोन तासांमध्ये पूर्ण केले पण शाहरुख ला प्रत्यक्ष भेटून ते देणे तिला जमणार नाही असं तिचं म्हणणं आहे .

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shahrukh khan purnima dey girls hostel zee yuva esakal news