Shahrukh Khan: 'सर,सुट्टी घ्या आता..', पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेल्या शाहरुखच्या ट्वीटनं उडवलेली खळबळ

शाहरुख खान हा त्याच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखला जातो.
Shahrukh Khan to PM Narendra Modi
Shahrukh Khan to PM Narendra ModiEsakal

Shahrukh Khan Tweet: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. त्याचं नाव सन्मानानं घेतलं जातं. जेव्हा नरेंद्र मोदी २०१४ साली देशाचे पंतप्रधान बनले त्यादरम्यान मोदींसाठी शाहरुख खाननं केलेली काही वक्तव्य व्हायरल झाली होती.

पण वेळेनुसार गोष्टी बदलल्या. आणि शाहरुख खान सोबत नरेंद्र मोदी यांचे असलेले स्नेह संबंध त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडले. शाहरुख खाननं एकदा नरेंद्र मोदींना एक सल्ला देखील दिला होता. पंतप्रधान मोदींविषयीचं हे वक्तव्य खूप व्हायरल झालं होतं. (Shahrukh Khan Statement on Pm Narendra Modi)

Shahrukh Khan to PM Narendra Modi
Narendra Modi: पंतप्रधानांना फ्री टाईम मिळतो का? मिळाला तर सिनेमा पाहतात की गाणी ऐकतात?..स्वतःच केला खुलासा

शाहरुख खाननं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या जन्मदिनी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं ट्वीटरवर मोदींची प्रशंसा करताना त्यांना एक सल्ला देखील दिला होता.

नरेंद्र मोंदी यांची प्रशंसा करताना शाहरुख खाननं लिहिलं होतं की-''देशासाठी आणि देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय प्रशंसनीय आहे. तुमची सगळी उद्दिष्ट्य पूर्ण होण्यासाठी देव तुम्हाला शक्ती देवो आणि निरोगी आयुष्य देवो. एक दिवस सुट्टी घ्या आणि आपला वाढदिवस साजरा करा. वाढदिवसाच्या शुभेच्छा''.

Shahrukh Khan to PM Narendra Modi
Kushal Badrike:'मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा पण त्याआधी..', कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

शाहरुख खानची ही पोस्ट खूपच प्रसिद्ध झाली होती आणि चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या होत्या. मोदी यांचे काही चाहते मात्र शाहरुखवर भडकले होते आणि त्याला ट्रोल करू लागले होते.

पण काही चाहते असे देखील होते ज्यांचं मन शाहरुखच्या या ट्वीटनं जिंकलं होतं. काही लोकांनी शाहरुखचं एक जुनं वक्तव्य व्हायरल केलं होतं,ज्यामध्ये मोदी पंतप्रधान बनल्यावर किंग खाननं देश सोडायचं विधान केलं होतं.

Shahrukh Khan to PM Narendra Modi
Vivek Agnihotri: 'याच्या सिनेमावर बंदी आणायला हवी..',नवाझुद्दिनवर भडकले विवेक अग्निहोत्री, ट्वीट करत उडवली खळबळ

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. याची चर्चा जोरदार होतेय. तर शाहरुख विषयी बोलायचं झालं तर त्याच्या सिनेमानं पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. त्याचा 'पठाण' सिनेमा यावर्षातला हिंदीतील सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com