शाहरूखचे यश अंकल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

शाहरूख खान हा बॉलीवूडचा "किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखला जातो. काही मोजके चित्रपट सोडले तर प्रेम हा त्याच्या चित्रपटांचा महत्त्वाचा गाभा आहे.

सध्या तो "जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाच्या जोरदार तयारीत आहे. कतरिना आणि त्याने "जब तक है जान'मध्ये आपल्या केमिस्ट्रीने सगळ्यांना अचंबित केले होते. शाहरूख हा किंग ऑफ रोमान्स असला तरी त्याच्याबरोबर रोमान्स पडद्यावर ठळकपणे मांडणारा दिग्दर्शक जर असेल तर काय कमाल होते,

हे आपण यश चोप्रा आणि शाहरूख या दोघांच्या चित्रपटांमधे पाहिले आहेच. शाहरूखला इम्तियाज अली याला पाहून यश चोप्रा यांची आठवण होते. इम्तियाजच्या अत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांमध्ये रोमान्स हा अविभाज्य भाग होता. आता "जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटातही एक लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाहरूख म्हणतो, "इम्तियाज'मध्ये मला यश चोप्रा दिसतात. इम्तियाजची कथा मांडण्याची पद्धत मला खूप आवडते. "जब वी मेट' मी थोडा पाहिला आहे आणि मला तो खूपच आवडला होता. 

Web Title: Shahrukh's Yash Uncle