महाराष्ट्र पोलिसांना ‘वंदे मातरम’ लघुपटाद्वारे मानाचा मुजरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

वंदे मातरम असे त्या लघुपटाचे नाव असून दोन मिनिटांच्या या लघुपटात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली आहे. तसेच त्यात मुंबईतील पोलिसांचे विविध मूडस् आणि सेवेतील क्षण टिपले गेले आहेत.

मुंबई ः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. लाॅकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी डाॅक्टर्स, नर्सेस तसेच अन्य वैद्यकीय कर्मचारी व कामगार आणि पोलिस स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र झटत आहेत. त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी काही गाणी-व्हिडीओ बनविण्यात येत आहेत. जेणेकरून या कोरोना योद्धांचे मनोबल वाढावे हा हेतू आहे. आता परसेप्ट लिमिटेडचे संस्थापक व चित्रपट निर्माते शैलेंद्र सिंग आणि उद्योगपती ऋषी सेठीया यांनी एकत्रित येऊन या कोरोना योद्धांना मानवंदना देण्यासाठी एक लघुपट बनविला आहे. 

हे ही वाचा - अक्षय कुमारचे एक नव्हे तर तब्बल चार बिग बजेट चित्रपट लांबणीवर, थेट पुढील वर्षीच होणार प्रदर्शित

वंदे मातरम असे त्या लघुपटाचे नाव असून दोन मिनिटांच्या या लघुपटात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली आहे. तसेच त्यात मुंबईतील पोलिसांचे विविध मूडस् आणि सेवेतील क्षण टिपले गेले आहेत. अत्यंत कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत ते सेवा कशा प्रकारे बजावत आहेत, त्याचे चित्रण आहे.

‘वंदे मातरम’च्या धुनवर हा व्हिडीओ चित्रित झाला आहे. त्याचे संगीत संयोजन संगीतकार सलील कुलकर्णी यांनी केले आहे. आजची आघाडीची पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिने हे गाणे गायले आहे. या चित्रफितीचे संकलन मनन कोठारी यांनी केले आहे.  या चित्रफितीचे लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र सिंग यांनीच केले आहे. परसेप्ट आणि बॉस एन्टरटेन्मेंट, सनबर्न कार्यक्रम आदींची सुरुवात त्यांनी केली होती.

या लघुपटाबद्दल शैलेंद्र सिंग म्हणतात, “महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस जे काम करत आहेत, त्याची झलक पूर्ण भारताला देण्याचा माझा मानस यामागे आहे. हे शूरवीर आज घरी जाऊ शकत नाहीत किंवा कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण जगातील भारतीयच आपल्या या पोलिसांना मानवंदना देत आहेत.”  

shailendra singh direct short film vande matram


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shailendra singh direct short film vande matram