"शेर-ए-पंजाब' मालिकेत शालीन भानोत 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

लाईफ ओकेवरील "शेर-ए-पंजाब : महाराजा रणजितसिंग' या आगामी भव्य ऐतिहासिक मालिकेचे निर्माते नामवंत कलाकारांना करारबद्ध करीत असल्याने तिची चर्चा सुरू आहे. स्नेहा वाघपासून आकाशदीप सहगलपर्यंत नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. आता शालीन भानोतही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तो महाराजा रणजितसिंग यांचे वडील महान सिंग यांच्या भूमिकेत दिसेल. याबाबत शालीन म्हणाला, या मालिकेचा एक भाग बनण्याच्या कल्पनेनेच मी उत्साहित झालो. या मालिकेतील महान सिंग यांची भूमिका ही माझी आजवरची सर्वांत आव्हानात्मक भूमिका असेल, असं मला वाटतं.  

Web Title: shaleen bhanot sher E punjab