Shalin Bhanot: पहिली पत्नी दलजीत कौरच्या दुसऱ्या लग्नावर शालीनने दिली ही प्रतिक्रिया, तिच्या भविष्याबद्दल अभिनेता म्हणाला… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shalin bhanot and dalljiet kaur

Shalin Bhanot: पहिली पत्नी दलजीत कौरच्या दुसऱ्या लग्नावर शालीनने दिली ही प्रतिक्रिया, तिच्या भविष्याबद्दल अभिनेता म्हणाला…

'कुलवधू' फेम अभिनेत्री दलजीत कौर लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. तिचे पहिले लग्न अवघ्या 4 वर्षातच तुटले. तिचा पहिला पती शालिन भनोटसोबत घटस्फोट झाला होता. पहिली पत्नी दलजीत कौरच्या दुसऱ्या लग्नावर शालीन भनोटने प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या 'बेकाबू' अभिनेत्याने काय म्हटले आहे.

दलजीत कौर 18 मार्च 2023 रोजी केनियातील रहिवासी निखिल पटेलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. निखिल पटेल हे दोन मुलींचे वडीलही आहेत. दलजीत दुसऱ्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. शालीन भनोटही आपल्या पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शालीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या एक्स-वाईफच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मी तिच्यासाठी उत्तम आयुष्याची प्रार्थना करतो. तिच्या आयुष्यात भरपूर प्रेम राहवं यासाठी मी शुभेच्छा करतो. मी तिच्या नव्या आयुष्यासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी आनंदी आहे…’ असं अभिनेता म्हणाला.

दलजीत आणि शालीन 'कुलवधू'च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ दोघांनी एकमेकांना डेट केले होते आणि 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, लग्नाच्या 4 वर्षानंतरच दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला.

यानंतर घटस्फोट घेतल्यानंतर २०१५ मध्ये हे जोडपे वेगळे झाले. दोघांना जेयडन नावाचा मुलगा आहे. दुसऱ्या लग्नानंतर दलजीत केनियाला शिफ्ट होणार आहे.