गायिका शाल्मली बनली संगीतकार!

shalmali kholgade Become a singer mix musician!
shalmali kholgade Become a singer mix musician!

मुंबई :  हिंदी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन, प्रतिस्पर्ध्यांना"परेशान'करणारी वेगळ्या आवाजाची मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे आता संगीतकारही बनलीय. तिने स्वतःचा एक म्युझिकव्हिडीओ अल्बम बनवलाय. त्यातलं गाणं तिनं गायलंय, संगीत तिनंच दिलंय आणि त्याचा व्हिडीओ बनवूनही तिनेच अपलोड केलाय. 
त्यासाठी युट्युब चॅनेलही तिनेच सुरू केलाय. थोडक्‍यात "सबकुछ शाल्मली'असाच हा अल्बम आहे... 

गायनाची लहानपणापासूनच आवड असलेल्या शाल्मलीला"इशकजादे'या चित्रपटातील"परेशान' हे गाणे गाण्याची संधी मिळाली. हे गाणे कमालीचे लोकप्रिय ठरले आणि शाल्मलीची हिंदी चित्रपटसृष्टीतील घोडदौडच सुरूच झाली. त्यानंतर तिने"कॉकटेल'"अय्या'"ये जवानी है दिवानी'"दावत-ए-इश्‍क'"सुलतान'अशा काही चित्रपटासाठी गाणी गायली. "ये जवानी'मधील तिने गायलेले"बलम पिचकारी...'हे गाणे कमालीचे लोकप्रिय ठरले. 
सध्या शाल्मली"स्टार प्लस'वरच्या"दिल है हिंदुस्थानी'या रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसतेय. या साऱ्या गडबडीतही तिने तिचा युट्युब चॅनेल लॉंच केलाय. या चॅनेलवर 
तिने स्वतः कंपोझ केलेले "ऐ' नावाचा म्युझिक अल्बम व्हिडीओ अपलोड केला आहे. 
हे गाणं लिहीलंय पराग अग्रवाल यांनी. त्याबद्दल सांगताना शाल्मली म्हणते,""पराग यांची आणि माझी ओळख फेसबुकवर झाली. फेसबुकवर त्यांची काही गाणी होती. मला आवडली 
ती, आणि म्हणूनच मी त्यांच्या कडूनच माझ्यासाठी हे नवे गाणे लिहून घेतले. संगीतकार म्हणून माझे हे पहिलेच गाणे आहे.'' 

शाल्मली खोलगडे नावाचा यु ट्युब चॅनेल सुरू करून तेथे टाकलेला आहे. यापुढे मी काही गाणी स्वतः कंपोझ करणार आहे आणि माझ्याच चॅनेलवर टाकणार आहे. शाल्मलीने आपल्या मनातील विचार या अल्बमद्वारे मांडल्याचं तिनं सांगितलंय."ऐ'असं हटके नावं असलेल्या या अल्बममधून तिने महिलांनी त्यांना जखडून ठेवणारी बंधने 
झुगारून द्यावीत, असा संदेश दिला आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com